Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. राज्यातील जवळपास सर्वंच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. 


रोहित पवार (Rohit Pawar) ट्विट करत म्हणाले की, एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाला 7-11 जागा, शिंदे गटाला 17-22 जागा आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत भीती पसरली आहे. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.


अजित पवारांना ठराविक जागांची ऑफर-


भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजित पवारांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली. तर 6 ते 7 जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिली आहे, असं रोहित पवार म्हणाले. 


"कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको"-


कर्जत जामखेड संदर्भात तर "कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको", असं सांगितल्याने कर्जत_जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील, असा विश्वास आहे, असं रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले. 


रोहित पवारांचं नेमकं ट्विट काय?






मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार?


गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संबंधित बातमी:


मुंबई, ठाणे ते रायगड, सिंधुदुर्गपर्यंत...; कोणाचं पारडं भारी?, विधानसभा निवडणुकीआधी सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर