Rohit Pawar on massajog sarpanch Santosh Deshmukh : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे 9 डिसेंबरला अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत.  विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या जवळचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकारणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय.     


रोहित पवार म्हणाले की, मी बीड आणि परभणीमध्ये जाऊन आलोय. तिकडची परिस्थिती बघितली आणि ती परिस्थिती मी आज सभागृहात मांडणार आहे.  बीडमध्ये एवढी दहशत आहे की, चांगल्या सरपंचाची हत्या झाली. वाल्मिक कराड यामागे आहे. आमच्या एका कार्यकर्त्यावर जेव्हा हल्ला झाला होता, त्यामागे सुद्धा तोच होता. पंकजा मुंडे यांनी देखील याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. जे कोणी यामध्ये असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  बीडला दोन मंत्री लाभले आहेत. दुसऱ्या मंत्र्यांनी कडक भूमिका घेतलेली नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.  


CM फडणवीसांकडे मोठी मागणी


ते पुढे म्हणाले की, बीडमध्ये जेवढं धनंजय मुंडे यांचे चालत नाही, तेवढे वाल्मीक कराडचे चालते. म्हणूनच धनंजय मुंडे बोलत नसतील. धनंजय मुंडे यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका घ्यावी.  वाल्मिक कराड आणि इतर गुन्हेगारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्रीपद घ्यावे, अशी मागणी यावेळी रोहित पवार यांनी केली आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे आव्हाड म्हणाले आणि लोकांची सुद्धा तीच भावना आहे. बीडमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.  गोपीनाथ मुंडे यांनी जी कडक कारवाई केली होती तीच भूमिका घेणे आज गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा 


Bajrang Sonwane: बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी