Rohit Patil on Narendra Modi, Kolhapur : "शाहू छत्रपतींच्या गादीला विरोध करण्यासाठी स्वतः देशाच्या पंतप्रधानांना इथे यावं लागतं. हा विरोध शाहू छत्रपतींना नाही तर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराला आहे. नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काल कोल्हापुरात (Kolhapur ) भडकाऊ भाषण केलं, तरुणांची माथी कशी भडकतील याची दक्षता घेण्याचा प्रयत्न मोदींनी केला", असे मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे रोहित पाटील (Rohit Patil) यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूरात बोलत होते. 


तरुणवर्ग बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल


रोहित पाटील म्हणाले, लोकांचा शाहू महाराजांच्या विचारांवर विश्वास आहे. आता असलेल्या सरकारबद्दलची चिड आम्हाला महाराष्ट्रात दिसत आहे. तरुणवर्ग यावेळी कोणत्याही भावनेच्या भरात न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल. महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील आणि एक चांगला संदेश देशभर जाईल. 


 सांगलीमधील गैरसमज लवकरच दूर होतील


पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, सांगलीच्या वादाला जयंत पाटील जबाबदार आहेत, असं मला वाटत नाही. घरातील नवरा-बायकोची भांडण बोलल्यानंतर मिटतात, असं मी ऐकलं माझं अजून लग्न झालेले नाही. आता झालेले सांगलीमधील गैरसमज लवकरच दूर होतील. महाविकास आघाडीचे घटक आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करतोय, असंही रोहित पाटील यांनी सांगितले. 


एकनाथ शिंदे यांच्या मुक्कामाचा फरक इथल्या मतदारांवर पडणार नाही


जे कोल्हापुरात पेरले जाते ते राज्यात उगवतं. दरडोई उत्पन्न जास्त असणारे हे शहर आहे. संपन्न जिल्हा आहे, त्यामुळे आपल्या ताब्यात असावा असं मुख्यमंत्र्यांना वाटणं साहजिक आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुक्कामाचा काहीही फरक इथल्या मतदारांवर पडणार नाही. रतन तात्यांनी आपल्या उद्योगांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणला आहे. त्यांचं योगदान आपण जाणतो. कोणाच्या तरी फोनवरून कोणाच्यातरी पाया पडत जातील असं मला वाटत नाही. रतन टाटांचं नाव देशात रिस्पेक्टफुली घेतल जातं. ज्यांचं नाव रिस्पेक्ट फुली घेतलं जात नाही ते का वाकत जाणार नाहीत. रतन टाटा हे स्वाभिमानी आहेत. रतन टाटा बद्दल केलेलं वक्तव्य योग्य नाही हे लोकच दाखवून देतील, असा इशाराही रोहित पाटील यांनी दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : ठाकरे-पवारांसाठी सहानुभूतीची लाट, छगन भुजबळांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया