कोल्हापूर : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बाजूला करुन सत्ता स्थापनेसाठी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन बैठका घेतल्या, असं मोठा दावा शिवसेना प्रवक्ते (Shiv Sena Leader) राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केला आहे. संजय राऊतांनी हॉटेल हयातमध्ये दोन बैठका घेतल्या. या बैठकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar), सुनील तटकरे (Sunil Tatkare), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मिलिंद नार्वेकर (Milind Narwekar) उपस्थित होते, असा मोठा खळबळजनक दावा राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केला आहे. याशिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मारण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता, असा गंभीर आरोपही राजू वाघमारे (Raju Waghmare Allegations) यांनी केला आहे. 


उद्धव ठाकरेंना बाजूला करुन सत्ता स्थापनेसाठी राऊतांच्या बैठका 


संजय राऊतांना (Sanjay Raut) मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायचं होतं, असाही दावा राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी केला आहे. शिवसेना (Shiv Sena Shinde Group) प्रवक्ते राजू वाघमारे कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकार परिषद (Press Conferrance) घेत खळबळजनक दावे केले आहेत. हॉटेल हयातमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन बैठका घेतल्या. उध्दव ठाकरे यांना बाजूला करून आपण सत्ता स्थापन करू यासाठी दोन मीटिंग घेतल्या. ज्या पक्षात राहतो त्याच पक्षाच्या नेत्याला बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला. अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर या बैठकीमध्ये उपस्थित होते, असा दावा राजू वाघमारे यांनी केला आहे.


राजू वाघमारे यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप


संजय राऊत यांना काहीतरी सिक्रेट माहीत असावे, म्हणून उध्दव ठाकरे काही बोलत नसावेत. संजय राऊत यांनी हे स्क्रिप्ट कोठून आले हे सांगावं. संजय राऊत यांचे नाव आम्ही नारद मुनी ठेवलं आहे, अफवा जास्तीत जास्त कशा पासरवल्या जातील, हे ते करत आहेत, महाराष्ट्र हे जाणून आहे, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.


एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट


रोज रात्री राष्ट्रीय कार्यक्रम झाल्याने सकाळी हँगओव्हर उतरत नाही. सकाळी नशेत ते रोज बडबडत आहेत. मी एक दिवसाआड एक-एक गोष्ट बाहेर काढणार. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट आखून सिक्युरिटी नाकारली होती, असा गंभीर आरोप राजू वाघमारेंनी केला आहे. शिंदे बाजूला करुन आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते, महाविकास आघाडी असतानाच संजय राऊत यांनी बैठक घेतली. संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून बैठक घेतली, असावी त्यांना सगळे पाहिजे होते.



महत्त्वाच्या इतर बातम्या :


एकतर माझं कुंकू लावा, नाहीतर त्यांचं तरी; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना कडक शब्दात इशारा