Rohini Khadse, Jalgaon : "नाथा भाऊ कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपात जात आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यात मी भाष्य करणार नाही, मात्र आमच्या रक्तात गद्दारी नाही. जेव्हापासून आम्ही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला,तेव्हापासून आम्ही निष्ठेने राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत प्रामाणिकपणाने काम केले आहे. जिथे उभे राहतो तिथे ठाम पणाने उभे राहतो आणि जिथे जमत नाही तिथे आम्ही बाजूला होतो", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) म्हणाल्या. बोदवड येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. 


मी पक्षाच्या सोबत राहणार, निष्ठेने काम करणार


रोहिनी खडसे म्हणाल्या, भाऊ या पक्षात राहून गद्दारी करू शकले असते,पण ते मनाला पटत नाही,म्हणून ते त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. मी पक्षाच्या सोबत राहणार आहे आणि निष्ठेने काम करणार आहे. तुमचा विश्वास मला पाहिजे आहे. विश्वास असतो तिथे माणूस काहीही करू शकतो आणि विश्वास नसला की पक्षाचे चांगले वातावरण खराब करण्याचे काम विरोधक करू शकतात. त्यामुळं एकसंघ रहा,आणि शरद पवार यांचे  आणि पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा, असं आवाहन रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केले. 


भाषण उरकत घेण्याची वेळ आल्याने नाराजी 


शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्यात भाषण उरकवण्याची सूचना मिळाल्याने रोहिणी खडसे यांनी  नाराजी व्यक्त केली. शरद पवारांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे. व्यासपीठावरील पुरुष लोक तुम्ही बोलू शकतात तेवढा आमचाही अधिकार आहे. व्यासपीठावरील एवढे पुरुष बोलतील तर एक महिला बोलायला नको ? एका महिलेला पाच मिनिटे बोलायला सांगाल तर कसं चालेल? आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही तर महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहोत. तिथे महिलांना समसमान अधिकार आहे, असंही रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी स्पष्ट केले. 


एकनाथ खडसे लवकरच घरवापसी करणार आहेत. दरम्यान खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत शरद पवारांनी भाष्य केलं.  एकनाथ खडसे नाईलाजास्तव भाजपमध्ये जात आहेत,असं म्हटलं पवार यांनी म्हटलं होत. शरद पवारांच्या वक्तव्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलय. देवेंद्र फडणवीस म्हणाले, याचे उत्तर एकनाथराव खडसे यांनीच द्यावे. त्यांचा इलाज आहे की नाईलाज आहे ? 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ranjeetsinha Naik-Nimbalkar on Madha Loksabha : मोहिते पाटलांनी भाजपला टोपी घातली, आता पीएम मोदी माळशीरसमध्ये सभा घेतील, रणजित निंबाळकरांची माहिती