Rohini Khadse: बापाला लागले स्वगृही परतीचे वेध, पण लेकीनं निर्धाराची तुतारी वाजवली! खडसेंच्या लेकीचा मोठा निर्णय!
Rohini Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी फेसबुक प्रोफाईलमधून एकनाथ खडसेंचा फोटो हटवला आहे. वडील एकनाथ खडसे यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं रक्षा खडसेंनी निर्णय घेतला आहे.
मुंबई : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी...' अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केलं... राष्ट्रवादी फुटली... तेव्हा सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) या ओळी म्हणत फुटीर गटाविरोधात हुंकार भरला होता. आता त्याच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका लेकीने वडिलांनी वेगळा निर्णय घतल्याने आपल्या फेसबुक प्रोफाईलमधून वडिलांचा फोटो हटवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी फेसबुक प्रोफाईलमधून एकनाथ खडसेंचा फोटो हटवला आहे. वडील एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं रक्षा खडसेंनी निर्णय घेतला आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी खडसे यांनी आपला निर्णय दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना पुण्यात जाऊन कळविल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा आपल्या फेसबुक प्रोफाईल मधील फोटो हटवला आहे. रोहिणी खडसे यांनी आता 'एकला चलो रे' ची भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षासोबत काम करण्याची भूमिका घेतली आहे सूत्रांच्या माहितीनुसार रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.
एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याचं दिसतंय. कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असंही रोहिणी खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. लवकरच राज्यभरात महिला मेळाव्यांचे आयोजन करत झंजावती दौरा करणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी माहिती दिली. लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी महिलांची सक्षम ताकद उमेदवारांच्या पाठीमागे उभी करणार असल्याची भूमिका रोहिणी खडसे यांनी घेतली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रोहिणी खडसे काय करणार याची उत्सुकता होती. आता रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यावर स्पष्टीकरण दिलं असून आपण शरद पवारांच्या सोबतच राहणार असल्याचं सांगितलं आहे.
हे ही वाचा:
रोहिणी खडसेंचा एक निर्णय आणि थेट भाजपलाच धोबीपछाड