Shrikant Shinde On Uddhav Thackeray: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याची संख्या मोठी असते. यामुळेच कल्याण लोकसभा क्षेत्रातील कोंकण वासियांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकणातल्या प्रवाशासाठी मोफत बस सेवा देण्यात आली. या बसेसना आज श्रीकांत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. कल्याण डोंबिवली दोन्ही शहराच्या चौका-चौकातून या बसेस संध्याकाळी मार्गस्थ झाल्या. या निमित्ताने बोलताना खासदार शिंदे यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा  उद्धव ठाकरे यांना टोमणा लगावला आहे. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी बोलताना अगोदर कोविडचे निर्बंध होतेच. मात्र कोविड कमी झाल्यानंतर देखील निर्बंध होते. हिंदूंचे सण आले की निर्बंध लागायचे. बाकी सर्व सण आले की मोकळीक दिली जात होती, असा टोला लगावला.


काही लोकांच्या सारथी चुकीचे असल्यामुळे त्यांच्या प्रवास वेगळ्या दिशेने गेला:  श्रीकांत शिंदे 


यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाले की, सारथीला महत्व खूप असतं. कोणाला कुठल्या दिशेला जायचं हे सारथी ठरवत असतो. ज्याचा सारथी बरोबर असतो त्याचा प्रवास योग्य दिशेला जात असतो. काही लोकांच्या सारथी चुकीचे असल्यामुळे त्यांच्या प्रवास वेगळ्या दिशेने गेला. असं म्हणत त्यांनी महाविकास आघडीला लक्ष्य केलं आहे. पण आता पुढे महाराष्ट्राचा प्रवास योग्य दिशेने चालू झालेला असल्याचे ते म्हणाले.


मागील दोन वर्षापासून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देत आहेत. मागील वर्षी मागणी कमी असल्याने तुलनेने कमी बसेस सोडण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्याने चौका-चौकातून बसेस एकाच वेळी मार्गस्थ झाल्या. कल्याण-डोंबिवली शहरातून सुमारे 350 बसेस कोकणात निघाल्या असून या सर्व बसेसना खासदार डॉ.शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी प्रवाशांना शुभेच्छा देतानाच एसटी कर्मचार्याचा सत्कार केला. तर आता आपण आपले सर्व सन धुमधडाक्यात साजरे करणार असून दहीहंडी पासून याची सुरुवात केल्याचे ते म्हणाले.


लोकांना त्रास होत असेल तर त्या गोष्टी सरकार करणार नाही,एसी लोकलबाबत श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरन


गर्दीच्या वेळी असलेल्या एसी लोकल बाबत निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात एसी लोकल कोणत्या वेळापत्रकामध्ये सुरू करायच्या, याबाबत एक बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. मात्र लोकांना जर त्रास होत असेल तर त्या गोष्टी आपण करणार नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.


एसटी कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविण्याचे प्रमाणिक प्रयत्न करू: श्रीकांत शिंदे


एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत एसटी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांना मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहेत. त्यांचे प्रलंबित प्रश्न आहे ते मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.