Raosaheb Danve, जालना : माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांना भोकरदन तालुक्यातील नांदखेडा येथे मराठा आंदोलकांनी घेराव घातला. मराठा आंदोलकांनी आपल्या मागण्याचे निवेदन यावेळी दानवे यांना दिले आहे. शिवाय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय. रावसाहेब दानवेही नांदखेडा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी गेले होते. त्यावेळेस मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवेदन दिलय.
आष्टी तालुक्यात मनोज जरांगे पाटलांची घोंगडी बैठक, भाजपला इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आष्टी तालुक्यात घोंगडी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही ही सर्वांची इच्छा आहे. हा समाज बलाढ्य आहे. समाज प्रगत होईल म्हणून आरक्षण मिळू द्यायचं नाही. अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत. राजकीय पक्षातील लोक आपल्यात फूट पाडत आहेत फूट पाडायची यासाठी सरकारने आंदोलन उभे केले आहेत.
निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे भावनिक केलं जाणार आहे. प्रत्येक राजकीय नेता पक्ष वाचवण्यासाठी निघाला आहे. अफाट संपत्ती केवळ मराठा समाजाच्या जीवावर आहे. हीच अवलाद मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही. आरक्षणावर कोणीच बोलायला तयार नाही. सगे सोयरेची अधिसूचना काढली आठ महिने झाले अंमलबजावणी नाही. हैदराबाद गॅजेट लागू करायला अडचणी काय आहेत. ही अडवणूक कशामुळे सुरू आहे. सरकारची भूमिका कळायला तयार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठे जे मागतात ते तुम्ही देत नाही आणि जे आम्ही मागत नाही ते तुम्ही देता
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, मराठी जे मागतात ते तुम्ही देत नाही आणि जे आम्ही मागत नाही ते तुम्ही देता आमची चूक काय आहे. ews रद्द करण्याचा घाट का घातला सरकार याचे उत्तर देत नाही. देवेंद्र फडणवीस सर्व चालवतात त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही मागतो. सरकारने अधिवेशन बोलवाव जो आमदार बोलणार नाही त्याला पाडायचं. नाटक कंपनीने नौटंकी नाही करायची अधिवेशन बोलवायचं मग समाज बघेल कोणता आमदार बोलणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात गलिच्छ रस्ते, तरुणांनी घेरलं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल