हिंगोली : भाजपत (BJP) आणखी एक बंडखोरी झाल्याने भाजपसह महायुतीला (Mahayuti) झटका बसला आहे. भाजपचे रामदास पाटील (Ramdas Patil) यांनी बंडखोरी करत लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज (Lok Election Application) दाखल केला आहे. लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अने हालचाली सुरु असल्याचं दिसून येत आहे. नुकताच जळगाव भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आता निवडणुकीच्या आधी भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. भाजप नेते रामदास पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हिंगोलीत रामदास पाटील यांची बंडखोरी
हिंगोली लोकसभेसाठी (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीकडून भाजपचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुरुवातीला हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांची उमेदवारी बदलावी आणि भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. रामदास पाटलांनी गुरुवारी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला
रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, आमचं मतदान हे 33 टक्के मतदान आहे. विचार करून फॉर्म भरला आहे, माघार घेणार नाही. छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला आहे. ही लढाई माझी राहिली नाही कार्यकर्त्यांचा हातात गेली आहे. माझा फार्म मी भरला आहे. मी वैयक्तिक फॉर्म भरला आहे, पक्षाची भूमिका मी नाही सांगणार, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
याला बंडखोरी म्हणत नाहीत : रामदास पाटील
महायुती असतानाही रामदास पाटील यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रामदास पाटील म्हणाले की, याला बंडखोरी म्हणत नाहीत आणि आम्ही निवडून येण्याच्या क्षमतेवर सर्व लोकसभा क्षेत्रातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी यांची भावना होती. हेमंत पाटलांबाबत व्यक्ती द्वेष नव्हता, पण ते निवडून येऊ शकत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची भावना होती, असं रामदास पाटील यांनी सांगितलं आहे. (Ramdas Patil Filing Nomination for Hingoli Lok Sabha Election 2024)
महत्त्वाच्या इतर बातम्या :