एक्स्प्लोर

ओवैसी म्हणाले, माझा लहान भाऊ तोफ; नवनीत राणा म्हणाल्या असल्या तोफा आम्ही घरात सजावटीला ठेवतो

नवनीत राणांच्या हैदराबादमधील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हिंदू शेरणी म्हणत नवनीत राणांच्या भाषणाचं भाजपा समर्थकांकडून समर्थन होत आहे.

अमरावती : लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आता भाजपाच्या इतर उमेदवारांसाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये असदुद्दीन औवेसींविरुद्ध (Asaduddin owaisi) भाजपच्या माधवी लता यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यावेळी, औवेसी बंधुवर जोरदार हल्लाबोल केला. नवनीत राणांनी अकबरुद्दीन औवेसींच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत केवळ 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग दोन्ही भावांना कुठून कुठे पळावं हे समजणार नाही, असे म्हणत निशाणा साधला होता. त्यानंतर, असदुद्दीन ओवैसी यांनी एक व्हिडिओ शेअर करत नवनीत राणांचे नाव न घेता, पलटवार केला. माझा लहान भाऊ तोफ आहे, असे ओवैसींनी म्हटलं होत. त्यानंतर, पुन्हा नवनीत राणा यांनी व्हिडिओ शेअर  करत असदुद्दीन ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. असल्या तोफा आम्ही सजावटीसाठी वापरतो, असे नवनीत राणांनी म्हटले आहे. 

नवनीत राणांच्या हैदराबादमधील भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हिंदू शेरणी म्हणत नवनीत राणांच्या भाषणाचं भाजपा समर्थकांकडून समर्थन होत आहे. राणा यांच्या भाषणावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही राणांना प्रतिआव्हान दिलं. ओवैसींनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ओवैसी म्हणाले की, "छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) तोफ आहे, तोफ... तो कोणाच्या बापाचं ऐकणारा नाही. त्याला समजावू शकणाऱ्याचं नाव असदुद्दीन ओवैसी आहे. ज्या दिवशी मी लहान भावाला सांगितलं, मी आराम करतो, आता तू सांभाळ. मग त्यावेळी तुम्हीच सांभाळा. तुम्हाला छोटा माहितीय ना? तोफ आहे तो...", असे असदुद्दीन औवेसींनी म्हटलं होतं. त्यावर, आता नवनीता राणांनी पलटवार केला आहे.  

ओवैसीनी सांगितले की माझा लहान भाऊ तोफ आहे. औवेसी अशा तोफांना आम्ही घरासमोर सजावटीत ठेवतो. मोठा सांगतोय की लहान खूप खुंकार आहे, अरे असे खुंकार आम्ही घरी पाळतो, अशा शब्दात नवनीत राणा यांनी औवेसींवर हल्लाबोल केला. तसेच, मी पण पाहते मुर्गी ओर मुर्गी का बच्चा कबतक खैर मनाता हे. मोठा सांगतोय की मी लहान भावाला समजावून ठेवलं आहे. अरे समजावून ठेवलं म्हणून नजरेसमोर आहे, नाहीतर देशात गल्लोगल्लीत शेर रामभक्त राहतात, असा इशाराही नवनीत राणा यांनी औवेसींना दिला. तसेच, आता लवकरच मी हैदराबादला येणार आहे, पाहते कोण अडवते मला, असेही राणांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. 

नवनीत राणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. आता या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं नवनीत राणा म्हणालेल्या. राणांच्या याच वक्तव्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घेतली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा

VIDEO : आम्हाला 15 सेकंद पुरे, नवनीत राणांचा ओवैसींना पुन्हा इशारा

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget