अकोला : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar) नव्या चिन्हाचं रायगडाहून लोकार्पण करण्याच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सडकून टीका केली. रायगडसारख्या पवित्रस्थळी राजकीय चिन्हाचं लोकार्पण होणं ही बाब चुकीच आहे, असं आमदार मिटकरी म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी मिटकरींनी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याबाबत मोठा दावा केला. राजेश टोपेंसह शरद पवार गटातील पाच ते सहा बडे नेते लवकरच अजितदादा गटात (Ajit Pawar) येणार असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.


राजेश टोपेंसह बडे नेते संपर्कात


"आमदार राजेश टोपेंसह शरद पवार गटातील पाच ते सहा बडे नेते लवकरच अजित दादा गटात येणार आहेत. आजच्या लोकार्पण सोहळ्याला शरद पवार गटाचे अनेक आमदार का अनुपस्थित होते?", असा सवाल यावेळी आमदार मिटकरींनी केला. 


अजितदादांवर टीका करणारे रोहित पवार आज कालवा बैठकीच्या निमित्ताने अजितदादांशी काय बोललेत?, असा सवाल आहे यावेळी आमदार मिटकरींनी केला. 


जितेंद्र आव्हाडांना तुतारी वाजवण्याचं आव्हान






दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांना तुतारी वाजवण्याचं दिलेलं आव्हान हे सर्वांसमोर एकट्याने तुतारी वाजवण्याचं होतं. एकट्याने ते पूर्ण केल्यास त्यांच्या नावाने एक लाखांचा धनादेश लिहून ठेवल्याचं मिटकरी यांनी सांगितले.  


अमोल  मिटकरी काय म्हणाले?


रायगडसारख्या पवित्र स्थळी राजकीय चिन्हाचं लोकार्पण होणं ही बाब चुकीची. आम्हीही रायगडावर कार्यक्रम केलेत, मात्र राजकीय बिल्ले आणि उपरणे वापरले नाहीत. आजच्या लोकार्पण सोहळ्याला शरद पवार गटाचे अनेक आमदार का अनुपस्थित होते?,  दादांवर टीका करणारे रोहित पवार आज कालवा बैठकीच्या निमित्ताने अजितदादांशी काय बोललेत? 


जितेंद्र आव्हाडांनी आज फक्त तुतारी वाजविण्याचं नाटक केलं. तुतारी वाजवितांना पोट आतमध्ये जावं लागतं. आव्हाडांचं पोट बाहेर होतं.  आमदार जितेंद्र आव्हाड यांना तुतारी वाजवण्याचं आव्हान दिलंय, त्यांनी एकट्याने वाजवून दाखवावी, त्यांना एक लाखाचा धनादेश देतो.


राजेश टोपेंनी दादांची गुप्त भेट का घेतली?  लवकरच राजेश टोपेंसह शरद पवार गटातील पाच ते सहा बडे नेते अजितदादांसोबत येतील.  यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले.  


राजेश टोपे-अजित पवार यांची भेट 


शरद पवार यांच्या जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे नेते आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज सकाळी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राजेश टोपे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून महाविकास आघाडी सरकारमधील राजेश टोपे हे आरोग्य मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे सगळेच नेते सोडून जात असताना आज सकाळीच अजित पवारांची राजेश टोपे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे. 


संबंधित बातम्या 


Rajesh tope And Ajit Pawar : शरद पवारांचे कट्टर समर्थक भल्या सकाळीच अजित पवारांच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण