मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून (South Mumbai Lok Sabha) निवडणूक लढण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. 


उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारातील मतदारांचा नार्वेकर यांना अनुभव आहे. कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. अरविंद सावंतांविरोधात आता नार्वेकर मैदानात उतरणार आहेत.


राहुल नार्वेकरांनी नारळ फोडला


दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आजच प्रचाराला सुरुवात करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीचा नारळ आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) बालेकिल्ल्यात फोडणार आहेत.


नार्वेकर यांचा वरळी विधानसभेत दोन दिवसीय वार्ड निहाय दौरा नियोजित आहे. ते वरळीत आज सकाळी 11 वाजता वॉर्ड क्रमांक 193 ला भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 11:40 वाजता वॉर्ड क्रमांक 196 कार्यालयास भेट देणार आहेत. दुपारी १२:२० वाजता वॉर्ड क्रमांक १९५ला नार्वेकर यांची भेट असेल. 


याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्थानिक नागरिकांसोबत  चर्चा करणार आहेत.त्यानंतर वॉर्डातील भाजपच्या प्रमुख पदाधिकांऱ्यांसोबत संवाद साधतील. 


दक्षिण मुंबईसाठी भाजपची विशेष रणनीती 


दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून, मुंबईतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी भाजपने अंतर्गत मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाकडे असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघाकडे भाजपने विशेष भर दिला आहे.  ठाकरे गटाची मते वळवण्यासाठी भाजपने मराठीचा मुद्दा घेऊन चालणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची साथ घेतली तर नवल वाटायला नको. त्यातच भाजप मनसे युतीच्या चर्चांना देखील काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली होती.


मनसेच्या साथीने मराठी मते स्वतःकडे वळवण्यास भाजपला मदत होईल. माझगाव, शिवडी, लालबाग परळ या ठिकाणी मनसेची असलेली ताकद जमेची बाजू आहे. बाळा नांदगावकर यांचा मराठी भागात असलेला प्रभाव याचीही भाजपला मदत होऊ शकते. 


संबंधित बातम्या  


Chandrashekhar Bawankule : बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल; चंद्रशेखर बावनकुळेंचं 'पाॅवर'मय भाकित!