मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बहुचर्चित गुढीपाडवा मेळावा आज शिवतीर्थावर संपन्न होत आहे. या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. मध्यंतरी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत जाणार का,याची प्रचंड उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांच्याकडून याबद्दल भाष्य करण्यात येणार आहे. मात्र, आजच्या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याचा पत्ता कोणालाही नाही.


एरवी राज ठाकरे मेळाव्यात साधारण काय बोलणार, त्यांचा अजेंडा साधारण काय असणार, याची कल्पना मनसेच्या नेत्यांना असते. मात्र, राज ठाकरे हे अमित शाह यांची भेट घेऊन दिल्लीतून परतल्यानंतर त्यांनी कमालीचे मौन बाळगले आहे. त्यामुळे राज ठाकरे आज गुढीपाडवा मेळाव्यात काय बोलणार, याची कल्पना त्यांच्या निकटच्या वर्तुळातील नेत्यांनाही नाही. राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार, याबद्दल मनसेचे नेतेच संभ्रमात आहेत. परंतु, राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका मनसेच्या नेत्यांनी घेतली आहे. 


MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava: थोड्याच वेळात राज ठाकरे आपली भूमिका मांडणार


राज ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात भाजपसोबत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यास हा निर्णय ते मनसैनिकांच्या गळी कसा उतरवणार, हे पाहावे लागेल. तसेच राज ठाकरे यांना भाजपकडून लोकसभेचा एखादा मतदारसंघ सोडण्यात आलेला आहे का, या प्रश्नावरुनही आज पडदा दूर होऊ शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलणार, ते भाजपसोबत जाणार का किंवा ते 'एकला चलो रे'ची भूमिका घेत सर्वपक्षीयांचे वाभाडे काढणार, याचे उत्तर थोड्याचवेळात मिळणार आहे. 


आणखी वाचा


हिंदुत्वासाठी महायुतीसोबत गेलो तर वाईट वाटणार नाही; राज ठाकरेंच्या सभेआधीच बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य