Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या रंगत आहेत. मात्र, अद्याप त्यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झालेला नसला तरी,  कधीकाळी एकाच पक्षात काम केलेले आणि एकनाथ खडसे यांचे सहकारी मित्र असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी या पक्षप्रवेशाबाबत खुलासा केला आहे.


ज्येष्ठनेते एकनाथ खडसे यांचे मन पहिल्या दिवसापासून भाजपमध्ये होते. ते आपसी नाराजीमुळे आमच्याकडे आले होते. पण रक्षा खडसेंना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्यानंतर त्यांचं तिकडे जाणे हे स्वाभाविक असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. सोबतच शरद पवार यांच्याकडे राहून एकनाथ खडसेंचे काहीही राजकीय भविष्य नसल्याची बोचरी टीकाही प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलीय. 


एकनाथ खडसेंना असेही राजकीय भविष्य नव्हतं


आगामी लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे आज महाविकास आघाडीतील जागावाटपाचा पेच सुटल्याचा दावा करण्यात आला असला तरी, त्यानंतर अनेक नेत्यामध्ये नाराजीनाट्य होताना दिसत आहे. अशातच सध्या महाविकास आघाडी आणि महायुती मधील पक्षामध्येही राजीनामे आणि पक्षप्रवेश होत आहेत. विविध पक्षामध्ये दिग्गज नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरु असतानाच राज्यातील एक बडा नेता पुन्हा घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. 


महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी हे बोगसच 


गेल्या अनेक दिवसापासून सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडी मध्ये रस्सीखेच पाहायला मिळत असून या जागेवरून मविआमध्ये मोठं वादंग सुरू आहे. आता यावरून विरोधकांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल हे गोंदियात असताना त्यांना सांगलीच्या जागे संदर्भात विचारणा केली असता त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायंस हे बोगसच आहे, अशी बोचरी टीका केलीय. सध्या  ते ज्या पद्धतीने लोकांना पटविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये काही तथ्य नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मोदींचा चारसो पारचा नारा सत्यात अवतरणार असल्याचा विश्वासही प्रफुल पटेल यांनी बोलताना व्यक्त केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या