Chandrakant Patil on Satej Patil , Kolhapur : अजित पवार राष्ट्रवादीत बंड करुन महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर कोल्हापुरातील राजकारणातही मोठे बदल झाले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे एकत्र आलेले पाहायला मिळाले. दरम्यान, घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आल्यानंतर सतेज पाटलांनी जोरदार टीका केली होती.  हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)आणि समरजित घाटगे मांडीला मांडी लावून कसे बसतात ? असा सवाल सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला होता. आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सतेज पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 


कोल्हापुरात आज (दि.9) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महायुतीचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते चंद्रकांत पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर आणि भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे आदी नेते उपस्थित होते. यावेळी अबकी बार चारसो पार, असा निर्धार करण्यात आला. 


काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?


कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात विरोधाभास आहे. सतेज पाटील भेद निर्माण करण्यात फार हुशार आहेत. हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे मांडीला मांडी लावून कसे बसतात असं सतेज पाटील म्हणतात. ते सोबत आले तर तुझ्या पोटात का दुखतं बाबा? एका घरात भांडण झालं, मारामारी झाली की परत एकत्र यायचं नाही का?  असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना केला आहे. 


आतापर्यंत फूट पाडण्याचेच काम केलं


सतेज पाटील तुम्ही आतापर्यंत फूट पाडण्याचेच काम केलं आहे. त्यामुळे फूट पडलेली माणसं एकत्र आली की तुम्ही घाबरता. कारण फूट पडलेल्या माणसांमुळेच तुम्ही विजयी होता. राजकारण कायमस्वरूपी दुष्मन बनणे, हे काही बरोबर नाही. एकत्र बसून मिटवून घेणं हे आमच्या जिल्ह्यात काही जणांना नको आहे. जितकी दुकानं जास्त तितका जास्त फायदा असं गणित असतं, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 


संजय मंडलिक म्हणाले, सतेज पाटील (Satej Patil) तुम्हाला आताच मी चुकीचा कसा वाटायला लागलो? 2026 पर्यंत संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकास करेल असं म्हटला होतात. तुम्हालाच निवडणुकीला उभा राहायला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही राजकीय बळी शोधला आणि शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना गळ घातली.


इतर महत्वाच्या बातम्या


सगळेच राजहट्ट पुरवले जाणार नाहीत, मंडलिकांचा शाहू महाराजांवर पहिला वार, सतेज पाटलांना म्हणाले, खासदारकी घरी वापरायची आहे का?