MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava: मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार : राज ठाकरे

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं याच गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार आहेत. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Apr 2024 08:24 PM
Raj Thackeray On Amit Shah: अमित शाहांच्या भेटीला गेलो कारण.....

Raj Thackeray On Amit Shah: अमित शहा यांच्या भेटीनंतर चक्र सुरु झाली.  मात्र का गेलो तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले आपण एकत्र आले पाहिजे. देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले एकत्र आले पाहिजे. म्हणून अमित शाहांना फोन करुन म्हटलो एकत्र यायचे म्हणजे काय? यासाठी अमित शाहांना भेटायला दिल्लीला गेलो. 

Raj Thackeray On  Alliance: मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार : राज ठाकरे

Raj Thackeray On  Alliance:  शिवसेनेचे प्रमुख व्हायचं असते तर आधीत झालो असतो. पक्ष फोडून मला कोणतीही गोष्ट करणार नाही.  मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. मी फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हाताखालीच काम केले. मी फक्त मनसेचा अध्यक्ष राहणार आहे. 

Raj Thackeray On Doctar Election Duty: डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का?, राज ठाकरेंचा सवाल

 Raj Thackeray On Doctar Election Duty: डॉक्टर मतदारांची नस तपासणार आणि नर्स डायपर बदलणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ज्या डॉक्टर, नर्सला निवडणुकांच्या ड्युटी लावल्या त्यांनी जाऊ नये, त्यांना कोण नोकरीवरून काढतो त्यांना मी बघतो, असा इशारा दिला.  

Raj Thackeray MNS Gudi Padwa: राज ठाकरे शिवाजी पार्कात दाखल, थोड्याच वेळात 'राजगर्जना' होणार

Raj Thackeray MNS Gudi Padwa:  राज ठाकरे  सभास्थळाकडे पोहचले आहेत.  थोड्याच वेळात मेळाव्याला संबोधित करणार आहे. 

Raj Thackeray MNS Gudi Padwa:  राज ठाकरेंच्या सभेअगोदर मुस्लीम मनसैनिकांनी केले नमाज पठण

Raj Thackeray MNS Gudi Padwa:  राज ठाकरे यांचे विचार आवडत असल्यामुळे शिवाजीनगर परिसरातून अनेक मुस्लिम मनसैनिक हे शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले आहेत. एकीकडे रमजान सुरू असल्यामुळे दिवसभराचा उपवास ठेवून त्यांनी शिवाजी पार्क मैदानातच रोजा सोडला, तिथे  नमाज देखील पठण केले.  जरी मनसे पक्षाने हिंदुत्ववादी भूमिका घेतली असली तरी देखील आम्ही राज ठाकरे यांच्या सोबत आहोत, अशी भावना व्यक्त केली आहे. 


Raj Thackeray MNS Gudi Padwa: थोड्याच वेळात राज ठाकरे आपली भूमिका मांडणार

Raj Thackeray MNS Gudi Padwa: शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत. पाहा राज ठाकरे यांची सभा पाहा थेट शिवाजी पार्कमधून


Vijay Wadettiwar: राज ठाकरे वाघ, पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar:   राज ठाकरे वाघ आहेत, परंतु त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सुरु आहे,  असं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाच्या शक्यतेवरुन विजय वडेट्टीवारांनी ही टीका केलीय. तसेच राज ठाकरे दिल्लीसमोर झुकणार नाहीत, अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे, असंही वडेट्टीवार म्हणालेत.  

Bala Nandgaonkar On BJP- MNS Alliance :   महायुतीत गेलो तर फायदाच होईल, बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य

Bala Nandgaonkar On BJP- MNS Alliance :  महायुतीत गेलो तर फायदाच होईल असे स्पष्ट संकेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेत. एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह बोलताना बाळा नांदगावकर यांनी हे सूचक वक्तव्य केलंय. हिंदुत्वासाठी एकत्र आलो तर वाईट वाटायचं कारण नाही असं नांदगावकर म्हणाले. 

Raj Thackeray Melava Navi Mumbai: राज ठाकरे यांच्या सभेसाठी नवी मुंबईतून कार्यकर्ते रवाना

Raj Thackeray Melava Navi Mumbai: राज ठाकरे यांच्या सभेसाठी नवी मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते निघाले. बसच्या माध्यमातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झालेत. राज ठाकरे काय भुमिका घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. भाजपाला पाठिंबा देणार की स्वतंत्र निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे. राज ठाकरे जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे मनसैनिकांचे मत आहे., 

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवली; SRPF आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकडी तैनात

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्याची सभा थोड्याच वेळात पार पडणार आहे. या सभेसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनासोबतच राज्य राखीव पोलीस दल,  क्विक रिस्पॉन्स टीम यांची देखील तुकडी तैनात करण्यात आली आहे. यावेळी सभेसाठी विशेष निमंत्रितांसाठी वेगळे पास करण्यात आले. व्हीव्हीआयपी गेटमधून केवळ याच लोकांना सोडण्यात येत आहे. आजच्या या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे काय बोलणार याकडे मनसैनिकांसोबतच राजकीय वर्तुळाचा देखील लक्ष आहे.  यंदाची लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढणार का? की पुन्हा एकदा राज ठाकरे पाठिंबा जाहीर करणार याबाबत देखील स्पष्टता येताना पाहायला मिळणार आहे. सभेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava:  राज ठाकरेंची तोफ कोणत्या मुद्द्यांवर धडाडणार?

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava:  राज ठाकरेंची तोफ कोणत्या मुद्द्यांवर धडाडणार?



  • आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करण्याची शक्यता 


 


  • सध्याच्या राजकारणावर भाष्य करण्याची शक्यता आहे 

  •  हिंदुत्व विरोधात कशाप्रकारे राज्यात परिस्थिती आणि अतिक्रमण सुरू आहे यावर बोलण्याची शक्यता

  •  महायुतीत जाण्यासंदर्भात आतापर्यंत काय घडलं? काय घडतंय याविषयी भाष्य करतील

  •  आपल्या पक्षाची नक्की आत्ताची भूमिका काय आणि पुढील भूमिका काय असणार आहे यावर भाष्य करतील

  •  पक्षाची पुढील वाटचाल आणि कोणते मुद्दे हाती घेऊन चालायचे हे स्पष्ट करण्याची शक्यता


 
 Vasai Virar MNS Melava:  वसई विरारमधून गुढीपाडवा मेळाव्यासाठी 75 बसेस रवाना

 Vasai Virar MNS Melava:  मनसेचा आज  शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा आहे. या मेळाव्यासाठी वसई विरारमधून 75 बसेस रवाना झाल्या आहेत. हजारोच्या संख्येने मनसे सैनिक शिवतीर्थावर पोहचणार आहेत. आजच्या भाषणात राज ठाकरे लोकसभेबाबत काय भूमिका घेतायत. याकडे मनसे सैनिकाच लक्ष लागून राहील आहे.

 MNS Melava Kalyan Dombivli:  कल्याण डोंबिवलीतून सुमारे 200 ते 250 बस दादर शिवतीर्थाच्या दिशेने रवाना

 MNS Melava Kalyan Dombivli:  पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. कल्याण डोंबिवलीत मधून देखील सुमारे 200 ते 250 बस दादर शिवतीर्थाच्या दिशेने रवाना झाल्यात शेकडो कार्यकर्ते गाड्या व लोकल ट्रेन ने दादरच्या दिशेने निघालेत .गेल्या महिनाभरापासून राज्यभरात मनसे महायुतीत सहभागी होणार का याबाबत चर्चा सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा नेते शिवसेने शिंदे गटाच्या नेत्यांची बैठका घेतल्यात, मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केले नाही . त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात.  मनसे महायुती सहभागी होणार का राज ठाकरे काय भूमिका घेणार? कार्यकर्त्यांना काय आदेश देणार ?हे आता मेळाव्यातच स्पष्ट होणार आहे 

MNS Melava  : मनसेच्या गुढीपाडव्याला रायगडमधून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर रवाना

 MNS Melava  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर आज गुढीपाडव्याची विशेष सभा पार पडणार आहे.  या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून अनेक मनसैनिक शिवतीर्थावर निघाले आहेत.  रायगडमधून देखील हजारो मनसे सैनिक मुंबईकडे राज ठाकरे यांच्या सभेला निघाले आहे.  

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या या पाडवा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष

Raj Thackeray:  गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरून (शिवतीर्थ)राज्यभरातील जनतेशी संवाद साधतात. राज ठाकरेंच्या या पाडवा मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असतं. 

Ambadas Danve:  आमचे वैचारिक विरोध, मात्र राज ठाकरे भाजपसोबत जाणार नाही: अंबादास दानवे

Ambadas Danve:  आमचे वैचारिक विरोध, मात्र राज ठाकरे भाजपसोबत जाणार नाही असं वाटतं. आम्ही देखील काँग्रेस विरोधी मात्र मनात द्वेष नव्हता.  असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केला आहे.  

MNS Gudi Padwa:    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबईतलं शिवाजी पार्क सज्ज

MNS Gudi Padwa:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान सज्ज झालंय. मनसेच्या या पारंपरिक मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार, याविषयी केवळ मनसैनिकच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे. याचं कारण आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं याच गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार आहेत. 

Chandrashekhar Bawankule: 'मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं : चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule:  'मोदींना साथ देण्यासाठी राज ठाकरेंनी सोबत यावं असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. तर राज ठाकरे आणि मनसेचा सन्मान करणं आमचं कर्तव्य असून, आजच्या मेळाव्यातून राज राज ठाकरे चांगला निर्णय घेती असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केलाय. 

पार्श्वभूमी

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी मुंबईतलं शिवाजी पार्क मैदान सज्ज झालंय. मनसेच्या या पारंपरिक मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार, याविषयी केवळ मनसैनिकच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे. याचं कारण आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची राजकीय भूमिका आणि मनसेची यापुढची दिशा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं याच गुढीपाडवा मेळाव्यात मिळणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.