Raj Thackeray Speech , कणकवली, सिंधुदुर्ग : " देशात उभी फूट झाली आहे. एकतर मोदींच्या बाजूने असा किंवा विरोधात असा. पण 2019 मध्ये मी जे बोललो, ते आजच्या विरोधी पक्षांमध्ये बोलण्याची गरज नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोधात गेलो. यांच्यासारखं नाही. मुख्यमंत्रिपद हवं होतं म्हणून विरोध करणारे आहोत, असं माझं नव्हत. भाजपचे अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री दिलं असतं तर आज जे बोलत आहात ते बोललं असतात. काल सांगितलं कोकणातले धंदे गुजरातला जात आहेत. वा रे वा 2014 ते 2019 या काळात तुम्ही त्यांच्या सोबत होतात. तेव्हा का विरोध केला नाही. कोकणात प्रकल्प आले तर स्फोट होईल म्हणणाऱ्या माहिती नाही का? की अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईत आहे. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार" असे मनसे अध्यक्ष राजे ठाकरे म्हणाले. भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
काही गोष्टी नाही पटल्या आजही पटत नाहीत
मी सरळ चालणारा आहे. ठाकरेंचा जेनेटिकली प्रॉबलेम आहे. मला एखादी गोष्ट पटली तर पटली. एखादी नाही पटली तर शेवटपर्यंत पटणार नाही. 2019 च्या सभेत मी मोदींचा जाहीर विरोध केला. काही गोष्टी नाही पटल्या आजही पटत नाहीत. याबाबत आपण मोकळे असणे गरजे आहे. या गोष्टी पटल्या नाहीत आणि या गोष्टी पटल्या. मग नोटबंदीची असेल पुतळ्यांची असेल. पण ज्या गोष्टी पटल्या त्याचे जाहीर कौतुक करणारा मी आहे. जेव्हा पासून मला राजकारणाची समज आली किंवा उमज आली. तेव्हापासून मी पाहातोय आणि वाचतोय. तेव्हापासून सुरु आहे. 370 कलम रद्द करा. मात्र, मोदींनी हे रद्द केलं. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल.
कोण कोण कुठचा बाबर आणि त्याला सांभाळणाऱ्या आपल्याकडच्या औलादी
राज ठाकरे म्हणाले, बाबरी मशीदीचा विषय आला. देशभरातून कारसेवक अयोध्येला गेले. तेव्हा दुरदर्शन होते. चॅनेल नव्हते. त्यांना स्लॉट दिले जायचे. तेव्हा तिथे कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. कोण कोण कुठचा बाबर आणि त्याला सांभाळणाऱ्या आपल्याकडच्या औलादी आहेत. 1992 साली बाबरीचा ढाचा गेला ती पाडली गेली. 1992 साली झालेली ती गोष्ट होती. आज राम मंदिराचा पहिला भाग उभा राहिला. रामलल्ला तिथे उभे राहिले. जस काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचंही झालं. नरेंद्र मोदींच्या सरकारमुळं राम मंदिर उभं राहिलं. कार सेवकांच्या आत्म्याला शांतता मिळाली. जे चांगलं झालं ते झालं. जे वाईट झालं ते वाईट झालं.
इतर महत्वाच्या बातम्या