Raj Thackeray: पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्त मोर्चा काढण्याचे ठरवल्यानंतर शासनाला जीआर रद्द करावा लागला . या पार्श्वभूमीवर आज वरळी डोममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला . यावेळी सन्माननीय उद्धव ठाकरे अशी सुरुवात करत राज ठाकरे मराठीवरून पुन्हा कडाडले . महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातींना मराठी आलीच पाहिजे यात वाद नाही .विनाकारण मारामारी करायची गरज नाही .पण जास्त नाटक केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही ..असं म्हणत राज ठाकरेंनी फटकारलं . यावेळी सभेला जमलेल्या मनसैनिकांसह सर्वांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत दाद दिली . सरकारचं पुढचं राजकारण तुम्हाला जातीजातीत विभागण्याचा आहे असे सांगत राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं .
यांचं पुढचं राजकारण तुम्हाला जातीत विभागणं आहे : राज ठाकरे
या देशात भाषावार प्रांतरचना झाली ती मुळातच यासाठी ना की की प्रत्येक भाग त्या भाषेचा होता म्हणून .या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात ?कशासाठी सुरू केल्या ?यामागचं राजकारण काय ? आत्ताच सांगून ठेवतो ..आज तुम्ही सगळे मराठी म्हणून एकत्र आलात .मराठी म्हणून एकत्र आलात .यांचे पुढचं राजकारण तुम्हाला जातीमध्ये विभागायला सुरू करण्याचं आहे . पुन्हा जातीचा कार्ड खेळायला सुरुवात करणार .मराठी म्हणून तुम्हाला कधीही एकत्र येऊ देणार नाही .पुन्हा जातीपातीत विभागायला सुरुवात करतील .
जास्त नाटक केली तर कानफाडीत मारायलाच पाहिजे : राज ठाकरे
'आता हे सुरू केलं, कुण्या व्यापाराच्या कानफाडीत मारली मीरा-भाईंदरला . काही हिंदी चॅनलमध्ये गुजराती माणसाला मारलं असं दाखवलं .बाचाबाची मध्ये समोरचा गुजराती निघाला इथला मराठी निघाला .याचा अर्थ गुजरात याला मारलं का ?किती व्यापारी आहेत .. अजून तर काहीच केलं नाही . अर्थात त्यांना मराठी आली पाहिजे यात वाद नाही .विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही .पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही ..पण चूक त्यांचे असली पाहिजे .एक गोष्ट लक्षात ठेवा .अशी कुठलीही गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका . यावेळी जमलेल्या मराठी बांधवांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत जोरदार दाद दिली .
'आपल्या आपल्या मध्येच त्यांना कळलं पाहिजे .कळलं का ! मारणारा कधी सांगत नसतो .मार खाणारा सांगत असतो .मला मारलं असं त्यांना सांगू दे .याचा अर्थ त्यांना उगाच मारायचं असं नाही .अनेक गुजराती लोक आहेत . माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून .त्यांना मी गुजराठी म्हणतो . तो अतिशय अप्रतिम मराठी तर बोलतोच .विनोदाचाही अंग आहे . शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे . मराठीच बाळकडू हे आमच्यासाठी बाळकडूच होतं .असंही राज ठाकरे म्हणाले .