Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally मुंबई: संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत.
मुंबईतील वरळी डोममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरळीत दाखल झाले आहेत. तसेच विविध मराठीप्रेमी देखील एनएससीआय डोममध्ये पोहचले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांआधी विविध राजकीय पक्षासोबत विविध साहित्यिक, कलाकार, शाळेतील शिक्षक, विविध मंडळे यांना मराठीसाठी सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. तसेच कोण कोण येत नाही, हेही बघतोच, असं विधानही राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर आज विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची हजेरी पाहायला मिळत आहे.
विजयी मेळाव्यात कलाकारांची गर्दी, पाहा यादी!
तेजस्विनी पंडीत
सिद्धार्थ जाधव
भरत जाधव
चिन्मयी सुमित
ऐतिहासिक सोहळ्याचे नियोजनही तसेच भव्यदिव्य-
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे आज विजयी मेळाव्याच्यानिमित्ताने 20 वर्षांनी एकत्र येणार आहेत. या विजयी मेळाव्याकडे ठाकरे बंधूंचे (Thackeray Brothers) राजकीय मनोमीलन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने या मेळाव्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांसोबत मराठी मतदारांच्या मनातही ठाकरे बंधू एकत्र यावेत, ही सुप्त इच्छा होती. ही इच्छा आज प्रत्यक्षात येणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे नियोजनही तसेच भव्यदिव्य करण्यात आले आहे.