मुंबई : मनसे (MNS)  अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय. राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीत सहभागी होत असल्याचं जाहीर केलं. तसेच दिल्लीतील  गृहमंत्री अमित शाह (Raj Thackeray Meets Amit Shah) यांच्या भेटीवर देखील भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे गेली दीड वर्षे एकत्र येण्यासाठी  मागे लागले होते. त्यावर राज ठाकरे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


अमित शाहांना फोन का केला? राज ठाकरे म्हणाले 


राज ठाकरे म्हणाले, वर्ष दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे मला म्हणत आहे की, आपण एकत्र आले पाहिजे? आपण एकत्र काहीतरी केले पाहिजे मी म्हटले शी...आणि मग मी म्हटले एकत्र आले म्हणजे नेमकं काय केले पाहिजे? मला समजेना मला देवेंद्रजी पण  तेच सांगत होते. मग मी म्हटलो नक्की एकत्र आले पाहिजे म्हणजे काय? मग मी अमित शाहांना फोन केला. नेमकं काय चालले मला कळाले नाही. म्हणून एकदा आपल्याशी बोलून काय नक्की बोलणे आहे कळाले पाहिजे, मग आमचे बोलणे झाले तिकडे मग आमच तिघांचे इकडे बोलणे झाले.


ऐकमेकांच्या घरी भेटायला जाण्यात कसला कमीपणा?: राज ठाकरे 


1980 साली बाळासाहेब ठाकरे हे इंदिरा आणि संजय गांधींना भेटायला गेले होते. भेटीला जायला काय अडचण आहे हे मला कळत नाही. मला अनेक लोक घरी येऊन भेटतात. लोक ऐकमेकांच्या घरी भेटायला जात असतात. त्यात मोठेपणा  आणि कमीपणा कसला आला, असेही राज ठाकरे म्हणाले. 


कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही : राज ठाकरे 


राज ठाकरे म्हणाले,  शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. मी कोणत्याही शिवसेनेचा पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री होणार नाही. मी जे अपत्य जन्माला घातलं आहे,त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सर्वांच्या विश्वासावर हा पक्ष उभा केला आहे. त्याला आज 18 वर्ष झाली आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.


विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश : राज ठाकरे


देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे हे लक्षात घेऊन केवळ नरेंद्र मोदींसाठी आपण बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. आपल्या पक्षाला विधानपरिषद, राज्यसभा काहीही नको असं भाजप नेत्यांना सांगितल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना थेट विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले.



हे ही वाचा :


Raj Thackeray Gudi Melava 2024  Highlights राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जहरी टीका; वाचा मेळाव्यातील दहा ठळक मुद्दे