Raksha Khadse on Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी करणार, असं सांगत आहेत. दरम्यान खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार असं स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) सून म्हणजे रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या रक्षा खडसे ?
रक्षा खडसे म्हणाल्या, एकनाथ खडसे यांनी या अगोदरही सांगितले होते की, त्यांना भाजपमध्ये यायचं आहे. मात्र, त्यांनी कधी यायचं आणि कधी नाही हे राज्यातील नेते देवेंद्र फडणीस आणि नड्डा जी ठरविणार आहेत. मात्र वेळ अजून ठरलेली नाही. भाजपामध्ये इतर पक्षातील मोठे नेते येत आहेत. मोदी यांचं नेतृत्व मान्य करत आहेत. त्यामुळे नाथा भाऊ पक्षात येतात यात काहीही विशेष नाही.
कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही
पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, गौण खनिज प्रकरणात आपल्याला नोटीस मिळाल्याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नसल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटल आहे. या विषयात आपण आपले म्हणणे मांडले आहे. त्यावर सरकारने विचार करावा अस आम्ही शासनाला दिली आहे. त्याची फेर चौकशी होऊन जो निकाल येईल तो पर्यंत ही स्थगिती मिळाली असल्याचं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या