Raj Thackeray Meet Jay Malokar's Family, Akola : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या घरी कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेले आहेत. अकोल्यातील मोठी उमरी भागातल्या जय मालोकार यांच्या घरी राज ठाकरे दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संघटनात्मक आढाव्यासाठी राज ठाकरे अकोला दौऱ्यावर आहेत. गेल्या महिन्यात 31 जुलैला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यामध्ये  जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला मृत्यू होता.


मनसे नेते अमित ठाकरे यांनी 1 ऑगस्टला घेतली होती मालोकारच्या कुटुंबीयांची भेट 


आमदार मिटकरी याच्या गाडी तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर यांचं नाव होतं. त्याच  ताणामुळे जय मालोकार यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या आधी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी 1 ऑगस्टला त्यांच्या निंबी मालोकार गावात जात भेट घेतली होती.


 मरण पावलेला मनसे कार्यकर्ता जय मालोकार कोण आहे? 


जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष होता.  परभणी येथे होता  होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षामध्ये तो शिक्षण घेत होता. जय मालोकार अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास होता. गेल्या पाच वर्षांपासून होता मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत होता. अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर मिटकरींची कार फोडण्यात आली. यामध्ये जय मालोकारचे नाव होते. मात्र याच ताणामुळे जय मालोकार यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 


मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज अकोल्यातील पक्षाचे दिवगंत कार्यकर्ते जय मालोकार यांच्या कुटूंबियांची भेट घेतलीय. गेल्या महिन्यात 31 जुलैला अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यात राडा झाला होताय. या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होताय. जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष होते. याबरोबरच जय मालोकर हा परभणी येथे होमिओपॅथी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्य तिसऱ्या वर्षाला शिकत होता. आमदार मिटकरी याच्या गाडी तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर यांचं नाव होतंय. दरम्यान, जय यांच्यासोबत घातपात झाल्याचा गंभीर आरोप जय मालोकारांच्या आईने केलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


'आप'ने महाराष्ट्र विधानसभेसाठी शड्डू ठोकला, अरविंद केजरीवालांचा तिसरा उमेदवार जाहीर