एक्स्प्लोर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: स्टेजवर उद्धव ठाकरेंकडून सत्काराची घोषणा, राज ठाकरे ऑकवर्ड झाले, भगवी शाल 'दादू'च्या खांद्यावर टाकली

Raj Thackeray and Uddhav Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सोहळा मुंबईत अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सोहळा मुंबईत अत्यंत भव्य आणि भावनिक वातावरणात पार पडला. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्तरित्या आयोजन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर एकत्र आले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच दोन भाऊ एका कार्यक्रमानिमित्त एकत्र  आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्यभराचे लक्ष लागले होते. 

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या अनपेक्षित कृतीने सगळेच चकित

कार्यक्रमादरम्यान एक असा क्षण आला, ज्याचा अंदाज उपस्थितांपैकी कुणालाही नव्हता. व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी राज ठाकरे यांना भगवी शाल देण्यात येणार होती. यासाठी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत दोघेही शाल हातात घेऊन राज ठाकरे यांच्याकडे पुढे सरसावले. मात्र, याच क्षणी राज ठाकरे यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. संजय राऊत यांच्या हातातील भगवी शाल त्यांनी अत्यंत सहजतेने घेतली आणि ती थेट उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात घातली. हा अनपेक्षित सत्कार पाहून सभागृहात काही क्षण स्तब्धता पसरली.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरेंच्या कृतीला टाळ्यांच्या कडकडाटात दाद

राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांचा सत्कार करतील, याचा कुणालाही अंदाज नव्हता. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे उद्धव ठाकरेही क्षणभर गोंधळून गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. सभागृहात उपस्थित कार्यकर्ते आणि नेत्यांकडून या क्षणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देण्यात आली.

Amit Thackeray and Uddhav Thackeray: अमित ठाकरे यांचाही भावनिक क्षण

या कार्यक्रमाला मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचाही सत्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित ठाकरे यांनी नम्रपणे सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पाया पडत काकांचे आशिर्वाद घेतले. हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक ठरला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray Bihar Bhavan Mumbai: आम्ही कुठल्याही परिस्थितीत मुंबईत बिहार भवन बांधणारच, बिहारच्या मंत्र्याचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

Dombivli News: डोंबिवलीत हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, राज ठाकरेंनी अविनाश जाधवांना पाठवलं, म्हणाले, 'तिचा प्रॉब्लेम....'

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget