मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कात (Shivaji Park) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मनसैनिक भाजपसह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी मोदी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेतच, त्यातच आता राज ठाकरे हेही महायुतीच्या प्रचारात उतरणार आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचाराची सांगता राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या संयुक्त सभेने होणार आहे.


पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे राजकीय व्यासपीठावर येणार एकत्र येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत शिवतीर्थावर होणार सभा होणार आहे. मुंबईतील महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवतीर्थावर सभा होणार आहे. 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत, त्याआधी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत. 


शिवाजी पार्कात मोदींची सभा, राज ठाकरेंची उपस्थिती


या सभेचं वैशिष्ट्ये म्हणजे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत. याच व्यासपीठावरुन मोदी आणि राज ठाकरे विरोधक आणि विशेष करुन उद्धव ठाकरे यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई आणि ठाण्यातील उमेदवारांसाठी शिवसेनेकडून पंतप्रधान मोदींच्या दोन सभांची मागणी करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.