Imtiyaz Jaleel On Navneet Rana : 'या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल', असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, अकोला येथील सभेत आपल्या भाषणातून नवनीत राणा यांच्यावर टीका करतांना जलील यांची जीभ घसरली.


नवनीत राणा यांच्यावर टीका करतांना जलील म्हणाले की, “असुदुद्दीन ओवेसी यांचे संसदेतील भाषण पाहा, त्यांनी म्हटले आहे की, आम्ही भगवान रामाचं आदर करतो. मात्र, आम्ही नथुराम गोडसेचं आदर करणार नाही. तर, नवनीत राणा म्हणतात की, 'या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून हे देश आला आहे का?, एकतर आम्ही अशा हलक्या लोकांच्या तोंडी लागत नाही. राणा यांनी माझ्यावर टीका केली असती तर मी सहन केले असते. मात्र, ओवेसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलल्यास ते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल, असे जलील म्हणाले.


तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे. 


तुम्हाला वाटत असेल की, दिल्लीत तुमचा बाप बसला आहे. त्या बापाच्या जीवावर तुम्ही काहीही बोलणार असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे. चांगले राहाल तर आमच्याकडून देखील चांगली अपेक्षा ठेवा. पण तुम्हाला वाटत असेल की, मी काहीही बोलणार, पण लक्षात ठेवा महिला असल्याने सन्मान करतोय. स्वतःच घर सोडून रस्त्यावर ढोल वाजवण्यासाठी जाणाऱ्या याच राणा आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी जाणाऱ्या राणा यांनी आपल्या घरात हनुमान चालीसा वाचली पाहिजे. असली नौटंकी आमच्यासोबत चालणार नाही. 'आगाज तुमने किया है, अंजाम तक हम ले जायेंगे' असे म्हणत जलील यांनी राणा  यांच्यावर टीका केली.


नेमकं काय आहे प्रकरण? 


असुदुद्दीन ओवेसी यांनी अधिवेशनादरम्यान संसदेत बोलतांना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी ओवैसी यांनी "बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद", असे नारेही दिले होते. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. "तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल" असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. आता त्यांच्या टीकेला जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Navneet Rana : देशात राहायचं असेल, तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, नवनीत राणा भर सभागृहात ओवेसींना भिडल्या