रायगड: लोकसभेचा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतदारांना चकवा देण्यासाठी रायगडमध्ये राजकीय खेळी खेळण्यात येत आहे. नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. रायगडमध्ये तीन गीते, दोन तटकरे (तटकरे, तटकरी) यांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून (Mahayuti) सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अनंत गीते (Anant Geete) हे रायगडमध्ये लढत आहेत. या दोन्ही प्रमुख उमेदवारांची नावाशी साधर्म्य नाव असलेल्या अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. यामुळे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांना फटका बसणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा उमेदवार रिंगणात आहे. सुनील दत्ताराम तटकरी नावाच्या व्यक्तीने अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीचे अनंत गीते यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी दोन अनंत गीते यांनीही अर्ज भरला आहे. अनंत गीते यांच्या नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींना उभे करून त्यांची विरोधकांनी कोंडी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे यंदाचा निवडणूकीत देखील मागच्या निवडणुकीप्रमाणे डमी उमेदवारांचा प्रमूख उमेदवारांना पाडण्याचा डाव विरोधकानी आखला आहे
साधर्म्य नावाच्या व्यक्तींचा तिढा कायम
सुनील तटकरे यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक अनंत गीते यांच्या विरोधातच लढवली होती, त्यावेळी त्यांच्यासोबत सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवार होता, त्याला 9 हजार 849 मते मिळाली होती. यामुळे तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता. तटकरेंच्या नावाची मते दुसऱ्या तटकऱ्यांना मिळाली होती, त्यामुळे त्याचा तटकरे यांना जबरी धक्का बसला होता हाच धोका याही निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्या मागे साधर्म्य नावाच्या व्यक्तींचा तिढा कायम आहे.
अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांना यावेळी काय फटका बसणार?
1991 सालच्या निवडणुकीत घडला होता. त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी एका दत्ता पाटील नावाच्या व्यक्तीला काँग्रेसने उभे केले होते. त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटील यांना बसला होता. अशीच खेळी यावेळीदेखील खेळण्यात आली आहे. त्यामुळे अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांना यावेळी काय फटका बसणार? नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :