Congress on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना सहा भावंडं आहेत, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचेही सहा-सात भावंडं आहेत. त्यामुळे जास्त मुलं असल्या संदर्भात मुस्लिमांवर टीका करू नका, अशी आठवण काँग्रेसचे (Congrss) मुस्लिम नेते पंतप्रधान मोदी यांना करून देत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यात हिंदूं एवढेच योगदान मुस्लिमांचेही होते आणि मुस्लिम तर मृत्यूनंतर दफनही या जमिनीतच होतात, हे विसरू नका, असे वक्तव्य नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नैश नुसरत अली (Nash Nusrat Ali) यांनी केले आहे.


देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचा समसमान योगदान असताना ही पंतप्रधान मुस्लिमांना घुसखोर म्हणत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही नैश नुसरत अली म्हणाल्या. निवडणूक आयोग या संदर्भात काही कारवाई का करत नाही, याचे आश्चर्य वाटते. लवकरच काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करेल. काँग्रेस पक्षाने तक्रार केली नाही, तर वैयक्तिकरित्या मी पंतप्रधान यांच्या वक्तव्याची तक्रार आयोगाकडे करेल असेही नैश नुसरत अली म्हणाल्या. 


.... मग मुस्लिम घुसखोर कसा?


या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिम लोकांचा असल्याचं काँग्रेसने (Congrss) या आधीच आपल्या जाहिरनाम्यातून स्पष्ट केलंय, त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत ज्यांना जास्त मुलं त्यांना जास्त संपत्ती मिळेल, असा याचा अर्थ असल्याचे सांगितले. काँग्रेसने आदिवासींच्या हिताकडे दुर्लक्ष केलं असून त्यांचा जाहीरनामा हा शहरी नक्षलवादाला बळ देणारा आहे, असा आरोपही पंतप्रधानांनी केला. अशातच काँग्रेसने याला प्रत्युत्तर दिलं असून मोदींकडे काही बोलण्यासारखं नसल्याने पुन्हा त्यांनी हिंदू-मुस्लिम असा वाद सुरू केल्याचा आरोप केलाय. देशाच्या स्वातंत्र्यात मुस्लिमांचा समसमान योगदान असताना ही पंतप्रधान मुस्लिमांना घुसखोर म्हणत असतील, तर हे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत नागपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नैश नुसरत अली यांनी बोलून दाखवली आहे. शिवाय या विरोधात आक्रमक पवित्रा घेत निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यामुळे पंतप्रधानांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोग कशा पद्धतीने दखल घेतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


नेमकं काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? 


राजस्थानमधील बांसवाडा येथे काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसचा जाहीरनामा हा माओवादाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस आता डाव्यांच्या जाळ्यात अडकली आहे. येथे आलेल्या एका मित्राने सांगितले की, काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसचं सरकार आले तर तुमच्या मालमत्तेचे ऑडिट होईल. आई आणि बहिणींच्या सोन्याचे आणि दागिन्यांचे मूल्य देखील मोजले जाईल, त्याचं वाटपही हे लोक करतील. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिमांचा आहे असं काँग्रेसने या आधीच म्हटलंय. तुमच्या संपत्तीवर यांचा अधिकार आहे का? हे लोक तुमच्या आया-बहिणींचे मंगळसूत्रही अंगावर राहू देणार नाहीत. भ्रष्टाचार हाच काँग्रेसचे शिष्टाचार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या