Rahul Gandhi Slams Modi Government: केंद्रातील मोदी सरकार हे नोकऱ्या देण्यात नाही, तर नोकऱ्या हिसकावून घेण्यास सक्षम आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजपवर केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षितता श्रेणीतील 91 हजारांहून अधिक पदांवर भविष्यात कधीही भरती होणार नाही, अशा बातम्यांचा हवाला देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.


राहुल गांधी यांनी फेसबुक एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ''मोदी सरकार नवीन नोकऱ्या देण्यास सक्षम नाही, परंतु उर्वरित नोकऱ्या हिसकावण्यात ते नक्कीच सक्षम आहे. लक्षात ठेवा ही तरुणाई तुमच्या शक्तीचा गर्व मोडून काढेल. त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणे, हे सरकारला महागात पडेल.''


तत्पूर्वी राहुल गांधी यांनी शुक्रवारी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हटले होते की, ते लोकशाहीची मुळे मजबूत करणारे व्यक्ती होते. मात्र भारतीय जनता पक्षाने गेल्या आठ वर्षांत संस्था नष्ट करून लोकशाही कमकुवत केली आहे. राहुल यांनी ट्वीट करत म्हटलं होत की, "IIT, IIM, LIC, BHEL, NID, BARC, AIIMS, ISRO, SAIL, ONGC... नेहरूजी हे संस्था निर्माते होते. ज्यांनी आपली लोकशाही मुळे मजबूत केली." राहुल गांधी म्हणाले की, "गेल्या आठ वर्षांत, भाजपने संस्था उद्ध्वस्त करून लोकशाही कमकुवत केली आहे.


'भारत जोडो'ची आवश्यकता  


देशाला आता 'भारत जोडो'ची सर्वात जास्त गरज आहे, असं ते म्हणाले. नेहरूंचे स्मरण करत त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, "मृत्यूच्या 58 वर्षांनंतरही, पंडित जवाहरलाल नेहरूंचे विचार, राजकारण आणि आपल्या देशासाठी त्यांची दृष्टी पूर्वीइतकीच समर्पक आहे. भारताच्या या अजरामर सुपुत्राची मूल्ये आपल्या पावलांना आणि बुद्धीला मार्ग दाखवत राहणार.''


इतर महत्वाच्या बातम्या: