रियाध : जगभरातील मुस्लिम बांधवांचे पवित्र ठिकाण असलेल्या मक्का (Mecca) शहरात एकप्रकारे मेळाच भरतो. जगभरातील मुस्लिम या ठिकाणी एकत्रित येतात. या ठिकाणी बरेच धार्मिक विधी केले जातात. त्यालाच हज यात्रा (Hajj Pilgrimage)असे म्हटले जाते. आयुष्यात एकदा, तरी हज यात्रा करण्याचे स्वप्न प्रत्येक मुस्लिमाचे असते असे म्हटले जाते. जो शरीराने सुदृढ असण्याबरोबरच या यात्रेचा खर्च करण्यासही सक्षम आहे तोच पूर्ण करू शकतो.  


म्हणजेच शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न (Healthy and Wealthy)असणाराच मुस्लीम बांधव ही यात्रा पूर्ण करू शकतो. अशामध्येच आता ही यात्रा मागील वर्षीच्या तुलनेत आणखी महाग होणार आहे. सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेवर लागणाऱ्या टॅक्समध्ये वाढ केली आहे.  त्यामुळे अर्थातच भारतातून हज यात्रा करणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे. 2019 च्या तुलनेत हा खर्च डबल असेल असे बोलले जात आहे. 


कोरोना महामारीने जगाला विळखा घातल्याने मागील दोन वर्ष 2020 आणि 2021 मध्ये हज यात्रेला मुस्लीम जाऊ शकले नव्हते. यावर्षी हज यात्रेवरील टॅक्स वाढवण्यात आला आहे. त्यामुळे यात्रा करू इच्छिणाऱ्यांना संकटाचा सामना करावा लागू शकतो. असे असले, तरी हज यात्रेत मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सामील होतील, असे बोलले जात आहे. 


हज यात्रेवर किती खर्च होतो ?


सन 2019 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास एका हज भाविकाला २ लाख ३६ हजार रुपये खर्च करावा लागत होता. मात्र, चालू वर्षात हाच खर्च तब्बल ४ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया सरकारकडून हज यात्रेच्या टॅक्समध्ये तब्बल 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीचा भिती लक्षात घेऊन एका खोलीमध्ये फक्त 2 लोकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. हजच्या व्हिसा आणि आरोग्य विमा शुल्कमध्येही वाढ करण्यात आली आहे.  त्याचबरोबर कुर्बानीसाठी स्वतंत्र 16 हजार 747 खर्च करावे लागतील. 


देशातील प्रत्येक शहराचा स्वतंत्र खर्च 


देशातील वेगवेगळ्या शहरातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांवर त्या शहराच्या हिशेबाने खर्च करावा लागणार आहे. हज यात्रा 2022 साठी हज इंडिया कमिटीकडून फी निश्चित करण्यात आली आहे. या फीनुसार  दिल्लीतून जाणाऱ्या यात्रेकरूसाठी 3 लाख 88 हजार रुपये, लखनऊमधून जाणाऱ्या यात्रेकरुसाठी 3 लाख 90 हजार रुपये, मुंबईतून जाणाऱ्या भाविकासाठी 3 लाख 76 हजार रुपये, तर गुवाहाटीमधून जाणाऱ्या यात्रेकरुसाठी 4 लाख 39 हजार खर्च करावा लागेल. 


               कोणत्या शहरामधून किती खर्च 



  • मुंबई                                      3,76,150

  • अहमदाबाद                            3,78,100

  • कोचीन                                   3,84,200

  • दिल्ली                                    3,88,800

  • हैदराबाद                                3,89,450

  • लखनऊ                                 3,90,350

  • बंगळूर                                   3,99,050

  • कोलकाता                               4,14,200

  • श्रीनगर                                   4,23,000

  • गुवाहाटी                                 4,39,500


हे ही वाचलं का ?