Rahul Gandhi, सांगली :  "मी हेलिकॉप्टर लँड होताना मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना म्हणालो की, कर्नाटकात जाताना खुश असतात. त्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रात असतानाही दिसतात. तेव्हा खरगे मला म्हणाले की, महाराष्ट्रात विचारधारा काँग्रेसची विचारधारा खूप खोलवर रुजलेली आहे. दलित - दलित राहिला पाहिजे, आदिवासी अदिवासी राहिला पाहीजे ही भाजपची विचारधारा आहे. ⁠मणिपूरमध्ये पंतप्रधान अद्याप गेलेले नाहीत, कारण त्या ठिकाणी भाजपच्या लोकांनी आग लावली आहे", असं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले ते सांगलीत बोलत होते. 


पतंगराव कदम यांनी आपलं संपूर्ण आयुष्य काँग्रेस आणि महाराष्ट्राला दिलं


राहुल गांधी म्हणाले, ⁠नफरत की राजनीती नको आहे. ⁠आम्हाला भाईचारा पाहिजे. पतंगराव कदम यांनी आपलं संपूर्ण आयुष्य काँग्रेस आणि महाराष्ट्राला दिलं. ⁠शिक्षण क्षेतरात त्यांनी काम केलं. ⁠काँग्रेस पार्टी सोबत राहिले. ⁠इंदिरा गांधी निवडणूक हरल्यानंतर ते सोबतच राहिले, असं म्हणत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्याविषयी भाष्य केलं. 


शिवाजी महाराज , आंबेडकर , फुले आणि आमची विचारसरणी समान आहे


पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, रात्री दोन वाजता त्यांनी बैठक आयोजित केली होती. शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांनी आपल्याला  दिशा दिली. ही लढाई अनेक वर्षांपासून आहे. शिवाजी महाराज , आंबेडकर , फुले आणि आमची विचारसरणी समान आहे.  ज्या ठिकाणी त्यांना आपली लोक टाकायची आहे. त्या ठिकाणी ते टाकत आहेत. ⁠आरएसएसचे तुम्ही असाल तर मिरीट नाही. आम्ही जात जणगणनेची मागणी करत आहोत. कोणाचा हक्क किती आहे तो दिसला पाहिजे. संसदेत मी म्हटलं आहे की काहीही झालं तरी जाती जणगणना केली पाहिजे. 


पंतगराव कदम यांनी साठ वर्ष काम केल मात्र त्यांनी माफी मागितली नाही. कारण चुकीच काम नाही केलं. मात्र काही दिवस पहिले शिवाजी महाराज यांची मुर्ती पडली. पंतप्रधान म्हणाले मी शिवाजी महाराज यांची माफी मागितली पाहिजे. त्यांनी आरएसएसच्या माणसाला कंत्राट दिल. मिरीटवरती काम नाही केलं म्हणून त्यांनी माफी मागितली असेल. ⁠दुसरं कारण असेल त्यांनी भ्रष्टाचार केला असेल. मात्र पतंगराव कदम यांची मूर्ती 50 ते 60 वर्ष पाहायला मिळेल, असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. 


शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांची नाही तर महाराष्ट्रातील सर्व जनतेची माफी मागितली पाहिजे. अदाणी अंबानी हे दोघेच सरकार चालवत आहेत. ⁠संसदेत यांचं नाव घेण्यास मला बंदी घातली. ⁠मग मी त्याच नाव A1 आणि A2 ठेवलं. दोन लोकांना फायदा पोहचवण्यासाठी सर्व लहान उद्योग बंद करण्यात आले. ⁠नोटबंदी आणि जीएसटीसाठी देखील माफी मागितली पाहिजे, असंही गांधी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


विनोद घोसाळकर दहिसर, किशोरी पेडणेकर भायखळा, वांद्रे पूर्व वरूण सरदेसाई, ठाकरेंचे संभाव्य 22 उमेदवार, यादी 'माझा'च्या हाती!