Maharashtra Vidha Sabha Election 2024 : मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरु असताना, इकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena) मुंबईतील (Mumbai News) संभाव्य उमेदवार ठरले आहेत. मुंबईतील संभाव्य उमेदवारांची एक्स्क्लुझिव्ह यादी एबीपी माझाच्या हाती आली आहे. मुंबई हा आपला बालेकिल्ला असल्याचं शिवसेना ठाकरे गटाने वेळोवेळी सांगितलं आहे. महाविकास आघाडी लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही एकत्रच सामोरं जाणार आहे. अजून जागावाटप निश्चित झालं नसलं तरी, सर्व पक्ष आपआपली संभाव्य यादी तयार करत आहे.
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी 14 जागा ठाकरेंनी जिंकल्या होत्या. शिवसेनेने मागील निवडणुकीत एकूण 56 जागांवर विजय मिळवला होता. मात्र आता पक्ष फुटीनंतर आमदार हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विभागले गेले आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबतच ठाकरेंसाठीही प्रतिष्ठेची ठरणार यात काडिमात्र शंकाच नाही.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील संभाव्य उमदेवार
1. विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी : मागाठणे
2. विनोद घोसाळकर : दहिसर
3. सुनिल प्रभू : दिंडोशी
4. अमोल किर्तीकर/ बाळा नर/ शैलेश परब : जोगेश्वरी
5. ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम
6. राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा
7. वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व
8. विशाखा राऊत/ महेश सावंत : दादर-माहिम
9. अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी
10. आदित्य ठाकरे : वरळी
11. किशोरी पेडणेकर/ जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा
12. ईश्वर तायडे : चांदीवली
13. अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर : चेंबुर
14. रमेश कोरगांवकर : भांडुप
15. सुनिल राऊत : विक्रोळी
16. संजय पोतनीस : कलिना
17. विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर
18. सुरेश पाटील : घाटकोपर
19. प्रविणा मोरजकर : कुर्ला
20. निरव बारोट : चारकोप
21. समीर देसाई : गोरेगाव
22. श्रद्धा जाधव : वडाळा
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईसाठी खास प्लॅनिंग
मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 14 जागा ठाकरेंनी 2019 मध्ये जिंकल्यात. यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढत असल्यामुळे मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत काही जागांची आदला बदली शक्य आहे. याबाबत वरिष्ठांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, असं सुत्रांच्या वतीनं सांगितलं जात आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात विधानसभा क्षेत्रात लीड मिळालं, त्या जागांसाठी ठाकरेंचा आग्रह असल्याचीही माहिती मिळत आहे.
मागील निवडणुकीत ज्या जागांवर ठाकरेंचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते, जिथे सध्या विरोधी पक्षाचा आमदार आहे, अशा जागांसाठीही आग्रह असल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये मुंबईत काँग्रेसचे केवळ चार तर राष्ट्रवादीने केवळ एक जागा जिंकली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला.