एक्स्प्लोर

Maratha Reservation: मराठा आरक्षणात देवेंद्र फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी अतिशहाणपणा करु नये; राधाकृष्ण विखे-पाटलांनी फटकारले

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल पाच दिवस उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. मात्र, या जीआरने टाचणीइतकाही फरक पडणार नाही.

Martha Reservation: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवा शासन आदेश (GR)  जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील आपले आंदोलन थांबवले होते. राज्य सरकारने आपल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्या या पुढील कालावधीत पूर्ण होतील. त्यामुळे आपण मराठा आरक्षणाची लढाई जिंकलो आहोत, असे सांगत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपले उपोषण सोडले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या जीआरमुळे मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) कोणताही फायदा होणार नाही, असे मत मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी मांडले होते. विनोद पाटील यांच्या या वक्तव्याचा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी समाचार घेतला. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्या लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरं तर या वेगवेगळ्य विचार प्रवाहांमुळे मराठा आरक्षणाचा संघर्ष कमकुवत झाला होता. सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. तर हे सगळे पुढे कसे जाील, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. इतकी वर्षे वेगवेगळे मतप्रवाह ठेवून आपल्याला आरक्षणाच्या लढाईत यश मिळालं का? नाही मिळालं, कायम अपयश पदरात पडले. आता निदान मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण असून सरकारच्या इच्छाशक्तीमुळे ते सर्वोच्च न्यायालयायतही टिकले आहे. त्यामुळे मराठा विचारवंतांनी टीका करण्यापेक्षा काही दिवस शांत बसावे. मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करुन हे यश मिळवले. आता सर्व मराठा विचारवंतांनी अंमलबजावणीत सहकार्य करावे, असा सल्ला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षणाचे श्रेय पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. या सगळ्या निर्णयप्रक्रियेत रोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा व्हायची. नव्या जीआरमुळे निर्माण होणारे कायदेशीर प्रश्न आणि पर्यायांबाबत आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करायचो. याबाबत सातत्याने आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभले, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

Radhakrishna Vikhe Patil: राधाकृष्ण विखे-पाटलांचं छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांनी म्हटले की, हा निर्णय एखाद्या विशिष्ट समाजासाठी वगैरे नाही. ब्रिटिशांच्या राजवटीत निजामशासित भाग सोडून जो भाग होता तिकडे नोंदी आहेत. 80 ते 90 टक्के शेती करणाऱ्यांना दाखले मिळाले. यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. कोणाचंही आरक्षण काढून घेण्यात आलेले नाही. सरकारची भूमिका  ही न्याय देण्याची होती. सरकारने जीआर काढताना सूचना, हरकती मागवल्या नाहीत, याबाबत त्यांना विचारणा केली असता विखे-पाटील यांनी म्हटले की, याबाबत आपण न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत विचार घेतलं आहे, महाधिवक्त्यांचं मत घेतलं आहे. हा निर्णय घाईत झालेला नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंनी इतरांच्या आरक्षणात लुडबूड करु नये: विखे-पाटील

लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नव्या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचे संकेत दिले. याबाबत बोलताना विखे-पाटील यांनी म्हटले की, लक्ष्मण हाके अन्य लोकांच्या आरक्षणात कशाला लुडबूड करतात. ज्यांचं आरक्षण आहे त्यांना ते मिळणारच आहे. कोणीह ओबीसींचं आरक्षण काढून घेत नाही. मराठा उपसमितीला काहीच कळतनाही, असं नाही. आपल्यालाच जास्त कळतं, असा अतिशहापणा लक्ष्मण हाके यांनी करु नये, असा टोलाही राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.

आणखी वाचा

जीआरचा टाचणी एवढाही फायदा नाही, नवीन काहीच नाही; विनोद पाटील यांनी सगळं सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget