Pushkar Singh Dhami: उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स संपला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मीनाक्षी लेखी उपस्थित होते. हे दोन्ही नेते आज विशेष विमानाने डेहराडूनला पोहोचले होते. धामी यांच्या विधिमंडळच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, ''मी पुष्कर धामी यांचे अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड प्रगती करेल. धामी यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे.''


धामी यांचे अभिनंदन करत उत्तर प्रदेशचे वरिष्ठ भाजप नेते केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत लिहिले आहे की, "उत्तराखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंड भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!"


दरम्यान, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र मुख्यमंत्री धामी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशा स्थितीत सरकारचे नेतृत्व कोण करणार, अशी शंका निर्माण झाली होती. यातूनच मार्ग काढण्यासाठी भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांची बैठक झाली आणि अखेर धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 19 जागा मिळाल्या आहेत. बसपाला दोन तर अपक्षांना दोन जागा मिळाल्या.


इतर महत्वाच्या बातम्या: