Abhishek Banerjee: पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी (Coal Scam) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी सोमवारी दिल्लीतील जनपथ येथील ईडीच्या विद्युत भवन मुख्यालयात पोहोचले आहे. तर याच प्रकरणी त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना मंगळवारी म्हणजेच 22 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता ईडी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीची चौकशी करणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना संचालनालयासमोर (ED) हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. यापूर्वी मागील वर्षी 10 सप्टेंबर रोजी या दोघांना समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी न्यायालयाला विनंती केली होती की, आम्ही पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याने आम्हाला दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स जारी करू नये, असे निर्देश ईडीला देण्यात यावे.
मनी लाँड्रिंग अंतर्गत दाखल करण्यात आला गुन्हा
या प्रकरणी बॅनर्जी यांची गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एका तपास यंत्रणेच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. सीबीआय (central bureau of investigation) ने नोंदवलेल्या नोव्हेंबर 2020 च्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ज्यामध्ये आसनसोल आणि त्याच्या लगतच्या कुनुस्टोरिया आणि कजोरा भागातील इस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणींशी संबंधित कोट्यवधींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर व्यवसायातून मिळालेल्या पैशाचे बॅनर्जी लाभार्थी असल्याचा दावा ईडीने केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी घट, 1549 नवीन रुग्ण आणि 31 मृत्यू
- Uttarakhand CM : कोण होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री? राजनाथ सिंह करणार नावाची घोषणा, धामीसह हे दिग्गज नेते शर्यतीत
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क