Rajya Sabha: पंजाबमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.आपनं (AAP) या जागांवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh), आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक (Sandeep Pathak), पंजाबचे आपचे सह-प्रभारी राघव चढ्ढा (Raghav Chadha), लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती अशोक मित्तल (Ashok Mittal) आणि कृष्णा प्राण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांच्या नावाची घोषणा केलीय. 







दरम्यान, 'आप'नं आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहेत. आपनं पंजाबबाहेरील लोकांना उमेदवारी दिली आहे. राज्याबाहेरील लोकांना द्यायला नको होती, अंस विरोधकांचं म्हणणं आहे. काँग्रेस नेते सुखपाल खैरा यांनी एक ट्विट शेअर करताना म्हटले आहे की, राज्यसभेसाठी उमेदवार बाहेरील राज्यातील नसावा. परंतु, आपनं जाहीर केलेले उमेदवार आमच्या राज्यातील नाहीत. ही पंजाबसाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. 


परराज्यातील लोकांना उमेदवारी देणे,  पंजाबशी भेदभाव आहे. कोणत्याही पंजाबबाहेरील व्यक्तीला राज्यसभेवर पाठवण्यास आमचा तीव्र विरोध असेल. दरम्यान, इतर राज्यातील लोकांना उमेदवारी देऊन आपनं पक्षासाठी दिवसरात्र झटलेल्या कार्यकर्त्यांची चेष्ठा केलीय. माझी भगवंत मान यांना विनंती आहे की, पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या बीबी खलरांसारख्या लोकांना राज्यसभा सदस्य बनवून त्यांचा सन्मान करा, असंही सुखपाल खैरा यांनी म्हटलंय. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha