Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात सातत्याने घट होत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 1,549 नवीन रुग्ण आढळले असून 31जणाचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4,30,09,390 वर पोहोचली आहे. सध्या देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 25,106 वर गेली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 लाख 16 हजार 510 झाली आहे.


आतापर्यंत 180 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 181 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. रविवारी दिवसभरात 2 लाख 97 हजार 285 डोस देण्यात आले. आतापर्यंत 181 कोटी 24 लाख 97 हजार 303 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दोन कोटींहून अधिक कोराना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. तर, कोरोना योद्धांसाठी लसीकरण मोहीम 2 फेब्रुवारीपासून सुरू झाली.





 


अंदमान निकोबारमध्ये एकही नवीन रुग्ण नाही
केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटांवर गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेले नाही. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेटांवर कोरोना संक्रमितांची संख्या 10,029 इतकी आहे. केंद्रशासित प्रदेशात केवळ दोन उपचाराधीन रुग्ण आहेत, तर गेल्या 24 तासांत दोन रुग्णांसह एकूण 9,898 लोक कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha