पुणे: पुण्यातील तरुणाईचा कल लोकशाहीच्या बाजूने आहे , पण पुण्यातील जेष्ठ नागरिक निरंकुश सत्तेच्या किंवा हुकूमशाहीला प्राधान्य देतायत का असा प्रश्न एका सर्वेक्षणामुळे निर्माण झालाय .  अमेरिकेत स्थायिक झालेल्या तरुणांनी जण प्रबोधिनी फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन केलेल्या सर्व्हेतून ही धक्कादायक बाब समोर आलीय . हा सर्वे करताना पुणेकरांना (Pune News) 86 प्रश्न विचारण्यात आले . त्या माध्यमातून पुणेकर लोकशाही व्यवस्था , मतदान प्रक्रिया आणि सामाजिक प्रश्नांबाबत कसे विचार करतायत याची चाचपणी  करण्यात आली . हा सर्व्हे करण्यासाठी 2045 पुणेकरांकडून ऑनलाईन प्रश्नावली (Pune Survey) भरून घेण्यात आली . सत्तर लाख लोकसंख्या असलेल्या पुण्याच्या दृष्टीने हा सँपल साईज अर्थातच खूप लहान आहे . पण या माध्यमातून पुणेकर कसा विचार करतायत याचा अंदाज यायला हरकत नाही . 


सर्वेक्षणातील ठळक बाबी खालीलप्रमाणे


* मतदान करणं आवश्यक आहे असं 90 टक्के पुणेकरांना वाटतं . 


* 76 टक्के पुणेकरांना मतदान बंधनकारक असावं असं वाटतं . 


* 18 ते 35 वयोगटातील 53 टक्के पुणेकरांना तर 56 हून अधिक वय असलेल्या 70 टक्के लोकांना त्यांच्या मताची नोंद होणं गरजेचं वाटतं . 


* मतदान करताना पुण्यातील तरुण अधिक लवचिकता दाखवून वेगवगेळ्या पक्षांची निवड करण्याला प्राधान्य देत आहेत. तर याच्या उलट जेष्ठ मात्र ते वर्षानुवर्षे ज्या पक्षाला मतदान करत आलेत त्याच पक्षाला मतदान करताना दिसतायत . 


* ५५ टक्के पुणेकर त्यांनी लोकसभेला त्यांनी ज्या पक्षाला मतदान केलं त्याच पक्षाला विधानसभेला देखील मतदान करणार असल्याचं म्हणतायत  तर 45 टक्के पुणेकर लोकसभेपेक्षा विधानसभेला ते वेगळा विचार करतील असं म्हणतायत . 


* लोकसभेला ज्या पक्षाला मतदान केलं त्याच पक्षाला विधानसभेला देखील मतदान करून असं म्हणणाऱ्यांमध्ये  67 टक्के जेष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 56 पेक्षा अधिक आहे . 


* सध्या आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या  रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसीच्या बाजूने 86 टक्के लोकांचा कल आहे . 


* टेक्नोक्रॅसी म्हणजे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडे निर्णय घेण्याचे अधिकार सोपवावेत असं 62 टक्के पुणेकरांना वाटतंय . 


देशात लोकशाही हवी की हुकूमशाही?


* थेट लोकशाहीच्या बाजूने 57 टक्के पुणेकर आहेत . 


* तर निरंकुश सत्ता किंवा हुकूमशाहीच्या बाजूने 39 टक्के पुणेकरांनी मत दिलंय . 


* 18 ते 35 या वयोगटातील 69 टक्के पुणेकरांनी कोणत्याही स्वरूपातील निरंकुश सत्तेला त्यांचा विरोध असल्याचं म्हटलंय . 


* तर निरंकुश सत्तेला आमचा विरोध राहील असं 56 पेक्षा जास्त वय असलेल्या 49 टक्के पुणेकरांनी म्हटलंय . 


* त्यामुळं उरलेले 51 टक्के पुणेकर जेष्ठ नागरिक निरंकुश सत्तेच्या बाजूनं आहेत हे दिसतंय . त्यामुळं पुण्यातील जेष्ठ तरुणांपेक्षा वेगळा विचार करत असल्याचं दिसतंय . 


* कमी उत्पन्न असलेल्या 67 टक्के पुणेकरांना थेट लोकशाही  हवी आहे. तर अल्प उत्पन्न असलेल्या 51 टक्के लोकांना थेट लोकशाही हवीय . 


* सात टक्के पुणेकरांना ते ज्या पक्षाला मत देतात तो कमालीचा भ्रष्ट असल्याचं वाटतं . 51 टक्के लोकांना थोडासा , ३१ टक्के जणांना जास्त भ्र्ष्ट असल्याचं वाटते. तर १२ टक्के लोकांना ते मतदान करत असलेला पक्ष अजिबात भ्रष्ट नाही, असं वाटते. 38 टक्के पुणेकरांना वाटत की, ते ज्या पक्षाला मतदान करतात तो पक्ष त्यांचे प्रश्न सोडवेल असं वाटतं . 43 टक्क्यांना काही प्रमाणात सोडवेल , 16 टक्के लोकांना बऱ्यापैकी सोडवेल असे वाटते . 


* 89 टक्के पुणेकर राजकीय पक्षाकडून दिल्या जाणारी माहितीवर विश्वास ठेवतात . ८६ टक्के रेडिओवर , मित्र आणि नातेवाईकांच्या सांगण्यावर 85 टक्के , न्यूजपेपरवर 66 टक्के तर टीव्हीवर 52 टक्के पुणेकर विश्वास ठेवतायत . 


* गंमतीचा भाग म्हणजे फक्त 53 टक्के पुणेकरांना वाटतंय की, इतर पुणेकर हे नॉलेजबल आहेत आणि ते  योग्य निर्णय घेतायत.


आणखी वाचा


अजितदादा गटाला 7 ते 11, शिंदे गटाला 17 ते 22 अन् भाजपला...; रोहित पवारांचा दावा, अंतर्गत सर्व्हे सांगून टाकला!