Pune Crime : राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे (Maharashtra Vidhansabha Election) निवडणूक आयोगाने (Election Commision) आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. दरम्यान, अशातच पुणे जिल्ह्यातील (Pune) भोरजवळ बड्या नेत्याशी संबंधित असलेल्या कारमध्ये मोठं घबाड सापडलंय. राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत 5 कोटींची रोकड आढळून आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. याच नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीत अंदाजे पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांना आढळून आली आहे. इन्कम टॅक्स व संबंधित विभागांना या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे. पुण्यात आज (दि.21) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.


निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल 


अधिकची माहिती अशी की, पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर (Khed shivapur) टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान पकडली आहे. इनोव्हा क्रिस्टा ही कार आहे.ही कार सांगोल्याची आहे. नलवडे नावाच्या व्यक्तीची ही गाडी आहे. या कारमधून ही रोकड सांगोल्याला नेण्यात येणार होती. ही कार सत्ताधारी नेत्यांच्या संबंधित व्यक्तीची आहे. पुणे ग्रामी पोलिस या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. काही वेळात याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. 


संजय राऊतांचे अप्रत्यक्षपणे शहाजी पाटलांवर गंभीर आरोप 


संजय राऊत (Sanjay Raut) ट्वीटरवर लिहितात, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी…काय डोंगर…मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15कोटी चा हा पहिला हप्ता!काय बापू..किती हे खोके? असा सवालही संजय राऊत यांनी केलाय. 








इतर महत्त्वाच्या बातम्या 


Sanjay Shinde : फडणवीसांना घाबरता, विधानसभेत बोलले नाहीत; बाहेर आलं की आरक्षण भेटायला पाहिजे म्हणतात, मराठा तरुणांनी संजय शिंदेंना घेरले


Mahadev Jankar : महादेव जानकरांचा नादच खुळा, पक्षात अभिनेत्रीची एन्ट्री, उत्सुकता ताणली; कोणत्या मतदारसंघातून लढणार?