Mahak Chaudhary in Mahadev Jankar  Party : विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सध्या प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरु आहे. अनेक कलाकराही याच पार्श्वभूमीवर राजकारणाची वाट धरतायत. नुकतच महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या रासप पक्षात अभिनेत्री महेक चौधरी हिने पक्षप्रवेश केला आहे. महेकने नुकतीच महादेव जानकरांच्या पक्षात एन्ट्री केलीये. त्यामुळे महेक आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार का याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. 


महेक ही अनेक काळापासून समाजिक कामांमध्ये व्यस्त होती. त्यामुळेच तिने आता जानकरांच्या पक्षात प्रवेश करत राजकीय प्रवासाला देखील सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे महेक जर विधानसभेच्या रिंगणात उतरली तर ती कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. 


महेक चौधरी कोण?


मूळची उत्तर प्रदेशची असलेल्या महेकने दाक्षिणात्य सिनेमातून तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. महेकने 2015 मध्ये महेकने तिचा पहिला सिनेमा केला जो दाक्षिणात्य होता. त्यानंतर महेकने बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेतली. महेकची अनेक गाणी ही सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असतात. तसेच सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. 


महादेव जानकर महायुतीमधून बाहेर


विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला. कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती. महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.         










ही बातमी वाचा : 


मोठी बातमी : महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढणार!