एक्स्प्लोर

आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य

कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही राहिली नाही खूप धाडसाने मी बोलत असल्याची थेट प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

Prithviraj Chavan: आज जे काय चाललं आहे त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, पैशाचा जो गैरवापर चालू आहे त्याला आपण लोकशाही म्हणू शकतो का? कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाही राहिली नाही खूप धाडसाने मी बोलत असल्याची थेट प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशातील त्यानुसार आपण लोकशाही राबवली. किती चांगलं संविधान असलं तरी अप्रमाणिक लोकांच्या हातात गेलं की काही चांगलं घडणार नाही. 

पक्षांतर आता होणारच नाही असं ते म्हणाले पण झालं उलटं

पक्षांतर बंदी कायद्यावर ते म्हणाले की,  पक्षांतर बंदी कायदा राजीव गांधी यांनी आणला. उत्तर भारतामध्ये जे काही प्रकार घडले त्यानंतर आणला. आयाराम गयाराम हा वाक्प्रचार प्रचलित झाला. चांगल्या आणि शुद्ध हेतूने याला आळा घालण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आणला. 1/3 आमदार खासदार आणि पक्ष सोडला तर नेमकं काय करायचं यासंबंधी कायदा होता. 2003 साली अरुण जेटली यांनी या कायद्यामध्ये संशोधन केलं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी कायदा कडक केला, अरुण जेटली यांचं मला अजूनही वाक्य आठवतं. पृथ्वीराज, हमने कानून बदला है अब अँटी डिफेक्शन नही होगा. पक्षांतर आता होणारच नाही असं ते म्हणाले पण झालं उलटं. महाराष्ट्र शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं त्याची 50 कारण दिली आहेत. 

सध्याचा पक्षांतर बंदी कायदा हा कचऱ्याच्या टोपलीत टाकला पाहिजे

त्यांनी सांगितले की, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी जिंकण्यासाठी मतदाराला पाच पाच लाख रुपये दिले. मधुकर लिमये यांनी पक्षांतर बंदी कायदा करत असताना म्हटलं होतं की तुम्ही हे करू नका खासदार गुलाम होतील आणि आज ती परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याचा पक्षांतर बंदी कायदा हा कचऱ्याच्या टोपलीत टाकला पाहिजे. सोपा कायदा करा तुम्ही जर पक्षाच्या विरोधात मत केलं की तुमचा सगळा अधिकार संपून जाईल, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, न्यायव्यवस्था आहे, निवडणूक आयोग आहे मात्र ते सुद्धा कॅप्चर केलं आहे. काही करून निवडणूक जिंका हाच राज्य मार्ग ठरला आहे. मेजॉरिटी मिळाली नाही तर ती मॅन्युफॅक्चर करा हे चाललं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
गणेश नाईक नक्की भाजपचेच आहेत का? त्यांचा DNA तपासला पाहिजे, आमदार मंदा म्हात्रेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय? 
Nitin Gadkari Nagpur : 'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
'मी म्हणतो आता तरुण लोक बोलवा, तुम्ही खोट्या न्यूज छापता की, गडकरी निवृत्त होणार', नितीन गडकरींचं मिश्किल वक्तव्य अन्...., नागपुरात नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget