Hanuman Status Gujarat: सध्या देशभरात हनुमान यांच्यावरून जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरतमध्ये हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करणार असल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच शनिवारी पंतप्रधान सकाळी 11 वाजता गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करतील.
मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती बसवण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात भगवान हनुमानाचा चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात स्थापित होणारी ही दुसरी मूर्ती आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिली मूर्ती बसवण्यात आली होती. तसेच दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशीच एक मूर्ती उभारण्यात येणार असून त्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात येत्या शनिवारी राजगर्जना होणार आहे. यामध्येच शिवसेना दादरच्या गोल मंदिरात हनुमानाची आरती करणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीवरुन राजकारण तापलं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही आरतीचे आयोजन
काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादावर न्यायालयाचा मोठा निर्णय, दिले 'हे' आदेश
कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी, मंत्री इश्र्वरप्पा देणार राजीनामा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha