Gyanvapi Masjid News: काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी आयुक्त नेमण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नियुक्त आयुक्त 19 एप्रिल रोजी मंदिर-मशीद परिसराला भेट देणार असून व्हिडीओग्राफीही करणार आहेत. दरम्यान, न्यायालयाने मंदिर मशिदी परिसरात सुरक्षा दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याने न्यायालयाकडून परिसराची तपासणी, रडार अभ्यास आणि व्हिडीओग्राफीसाठी आदेश द्यावेत अशी विनंती केली होती. वाराणसी जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर 2020 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला आहे.


काय आहे प्रकरण? 


वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराजवळ ज्ञानवापी मशीद आहे. सध्या मुस्लिम समाज दिवसातून पाच वेळा येथे सामूहिक नमाज अदा करतो. अंजुमन-ए-इंट्राझिया समितीद्वारे ही मशीद चालवली जाते. 1991 मध्ये वाराणसीच्या दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जात दावा करण्यात आला आहे की, ज्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद आहे, तेथे पूर्वी विश्वेश्वराचे मंदिर होते आणि शृंगार गौरीची पूजा केली जात होती. मुघल शासकांनी हे मंदिर तोडून ताब्यात घेतले आणि येथे मशीद बांधली. अशा परिस्थितीत ज्ञानवापी संकुल मुस्लिमांच्या ताब्यातून रिकामे करून हिंदूंच्या ताब्यात द्यावी आणि त्यांना शृंगार गौरीची पूजा करण्याची परवानगी द्यावी, असं या अर्जात लिहिलं आहे. 


काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टशी कोणताही वाद नाही


ज्ञानवापी मशिदीचा काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टशी कोणताही वाद नाही, हेही येथे नमूद करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणात मंदिर ट्रस्ट कुठेही पक्षकार नाही किंवा त्यांनी कुठेही याचिका दाखल केलेली नाही.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tax On Petrol Diesel : महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करणार का?


कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी, मंत्री इश्र्वरप्पा देणार राजीनामा