Contractor Santosh Patil death case : काम केलेले बिल मिळाले नाही म्हणून आणि मंत्री इश्र्वराप्पा चाळीस टक्के कमिशन मागतात म्हणून चिठी लिहून ठेवून उडुपी येथे आत्महत्या केलेल्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाला असून  ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के.एस.इश्र्वरप्पा यांनी आपण राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.


कंत्राटदार संतोष पाटील याने चार कोटी चे काम पूर्ण केले होते.पण काम केलेले बिलाची रक्कम त्याला मिळत नव्हती.बिलाची रक्कम अदा करण्यासाठी मंत्री ईश्र्वराप्पा यांनी चाळीस टक्के कमिशन मागितल्याचा आरोप सतीश पाटील यांनी केला होता. त्या नंतर या बाबत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे देखील दाद मागितली होती. त्यानंतर संतोष यांच्यावर दबाव आणण्यात आला होता.दबाव आल्यामुळे आणि केलेल्या कामाचे पैसे पंचायत राज खात्याकडून मिळत नसल्याने ते निराश झाले होते. त्यामुळे संतोष यांनी  आपल्या आत्महत्येला मंत्री ईश्र्वराप्पा जबाबदार आहेत अशी चीठी लिहून संतोष यांनी उडुपी येथील लॉजमध्ये आत्महत्या केली. आपण राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतलेल्या मंत्री ईश्र्वराप्पा यांना अखेर राजीनामा देण्याची घोषणा करावी लागली. भाजप हायकमांडने हे प्रकरण गांभीर्याने घेवून  मुख्यमंत्री बोम्मा ई यांना मंत्री ईश्र्वराप्पा यांचा राजीनामा घेण्याची सूचना केली. त्यामुळे आता मंत्री ईश्र्वराप्पा यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेसने हे आत्महत्या प्रकरण धसास लावण्यासाठी विधानसभेच्या प्रवेश द्वारावर आंदोलन सुरू केले. 


राज्यात देखील अनेक ठिकाणी मंत्री ईश्र्वराप्पा यांनी राजीनामा द्यावा मागणी करून आंदोलन छेडले.त्यामुळे भाजप पक्ष श्रेष्ठींना याची गंभीर दखल घ्यावी लागली आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री ईश्र्वराप्पा यांचा राजीनामा घेण्याची सक्त सूचना केली. मृत संतोष पाटील यांचे काम केलेले पाच कोटी आणि कुटुंबाला एक कोटी मदत द्यावी आणि संतोष यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी संतोष यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना केली. संतोष हे भाजप कार्यकर्ते असून देखील एकही भाजप नेता अंत्यविधीला उपस्थित राहिला नाही अशी टीकाही हेब्बाळकर यांनी केली. भाजप सरकार किती बळी घेणार आहे असा सवाल देखील हेब्बाळकर यांनी केला.