एक्स्प्लोर

मोठी बातमी : अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेणार होते, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट; अमोल कोल्हेंनी मानले आभार

Shirur Lok Sabha Election 2024 : पाच वर्षे अमोल कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पाहावा, अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

पुणे : शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपचं (BJP) कमळ (Lotus) हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उभं राहायला इच्छुक होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे. हा आरोप करताना शिरूर लोकसभेत अमोल कोल्हेच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग आहे. पाच वर्षे कोल्हेंनी राजकीय नाटकं केली, आता त्यांनी त्यांचा धंदा पाहावा, अशी खोचक टीका ही दरेकर यांनी केली आहे. शिरूर लोकसभेत महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळरावांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर शिरुर येथे आले होते. शिरुरच्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अमोल कोल्हेंनी मानले प्रवीण दरेकरांचे आभार

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन, लोकसभा निवडणुकीत उभं राहायला इच्छुक होते, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केला. आता दरेकरांचा हा गौप्यस्फोट कोल्हेंनी खोडून काढला आहे. दरेकरांकडे इतकी चांगली विनोद बुद्धी आहे. याची मला कल्पना नव्हती. मात्र त्यांच्या या वक्तव्यानं मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, याचं सर्टिफिकेट दरेकरांनी दिलं. असं म्हणत अमोल कोल्हेनी  दरेकरांचे आभार मानले. 

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

प्रवीण दरेकरांकडे एवढी चांगली विनोदबुद्धी असेल, याची मला कल्पना नव्हती. तशी गोष्ट असेल तर, मी प्रवीण दरेकरांचे आभार मानतो. कारण, आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा, असा एक नारा दिला जातो. त्या पात्रतेमध्ये मी बसत नाही, त्यामुळे दरेकरांना मी फीट वाटलो नसेल, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, म्हणून मी दरेकरांना फीट वाटलो नसेल. सध्या जे कोणी त्यांच्या जवळ जात आहेत, त्यांच्यावर काही ना काही आरोप आहे. दरेकरांनी मी स्वच्छ आहे, याचं सर्टिफिकेट दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget