Pratap Sarnaik on Tanaji Sawant, Dharashiv : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आलं. मात्र, शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या तानाजी सावंतांना (Tanaji Sawant) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रिपद प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना मिळालंय. धाराशिव (Dharashiv) दौऱ्यावर आले असता प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तानाजी सावंतांच्या Tanaji Sawant) नाराजीवर भाष्य केलंय. 


प्रताप सरनाईक काय काय म्हणाले?  


प्रताप सरनाईक म्हणाले, राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते आदलाबदल होत असते, असं म्हणत तानाजी सावंत यांच्या नाराजीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केलंय. पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर होते. त्यावर नाराजी बाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं.


पालकमंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईकांचा धाराशिवमध्ये पहिला निर्णय 


पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी धाराशिवमध्ये पहिला निर्णय आरोग्य विभागाबाबत घेतलाय. तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी  पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतल्याने चर्चा सुरु झालीये. धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सरनाईकांनी स्पष्ट केलंय.




राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही ती बदलत असते आदलाबदल होत असते, तानाजी सावंत यांच्या नाराजीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य 


पहिल्या जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर, नाराजी बाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचं सरनाईकांनी सांगितलं


पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांचा पहिला निर्णय आरोग्य विभागाचा, तुळजापुरात उभारणार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल


माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी  पहिला निर्णय आरोग्य विभागाचा घेतल्याने चर्चा


धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सरनाईकांनी केलं स्पष्ट


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Guillain Barre Syndrome in Pune: गुलेन बॅरी सिंड्रोममुळे राज्यातला पहिला मृत्यू, सोलापूरच्या तरुणाचा व्हिसेरा तपासणीला पाठवणार


Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!