Pankaja Munde : मागील आठवड्यात राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली. यात भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांचे जालन्यात आगमन झाले. आज त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. पंकजा मुंडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त शेतकरी खेळाडू आणि पोलिसांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार देखील करण्यात आला.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पाऊल ठेवणे यापेक्षा मोठा सुवर्णयोग काय असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील लोकांना कधी पक्षपातीपणा जाणवणार नाही. अत्यंत संवैधानिक पद्धतीने सर्व वर्गाला न्याय मिळेल, असा शब्द पंकजा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हावासियांना दिला.
प्रजासत्ताक दिनी पहिलं पाऊल जालन्यात ठेवलं हा सुवर्णयोग
पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन-चार दिवस आधीच सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाले. मला जालना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले. त्या क्षणाला जालन्यातून अक्षरशः फोनचा वर्षाव झाला. लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तो बघून मला देखील खूप आनंद झाला. मला या जिल्ह्यात काम करण्यासाठी खूप चांगले वातावरण मिळाले आहे. मी आज येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आलेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्याही जिल्ह्यात पहिलं पाऊल ठेवणे यापेक्षा सुवर्णयोग काय आहे, असे त्यांनी म्हटले.
सर्व वर्गाला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंचा शब्द
त्या पुढे म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या देशात जो कोणी शपथ घेतो तो ही शपथ घेतो की, आपण कोणाविषयी ममत्वभाव बाळगणार नाही. कोणाविषयी वैराची भावना ठेवणार नाही. सरकार म्हणून लोकांच्या हिताची काम करत राहू. तसेच पालकमंत्री म्हणून जालन्यामध्ये मी आलेली आहे. या जिल्ह्याचे काम करत असताना पक्षपातीपणा कधीही लोकांना जाणवणार नाही. अत्यंत संवैधानिक पद्धतीने सर्व वर्गाला न्याय मिळेल, अशा प्रकारचे भूमिका घेऊन मी काम करणार आहे, असं वचन मी जिल्हावासियांना देते, असे त्यांनी यावेळी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Mahadev Munde : परळीतील महादेव मुंडेंचा खून कोणी केला? वाल्मिक कराडच्या मुलावर काय आरोप?