एक्स्प्लोर

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi मोठी बातमी: मराठीवरुन माघार नाही, प्रताप सरनाईक ठाम, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या बैठकीत काय ठरलं?

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi: आम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करू, मात्र हिंदीतच बोलू, अशी त्यांची भूमिका असेल तर हे चालणार नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi: मी प्रताप सरनाईक या निर्णयापासून मागे फिरणार नाही. अनेक संघटनांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे. अनेक संघटनांनी मुदत मागितली आहे. मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. रिक्षा आणि टॅक्सी (Taxi-Auto) चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य (Marathi Language) करण्याचा निर्णय लागू करण्यापूर्वी राज्य सरकारने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कामगार नेते शशांक राव व संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद विविध माहिती दिली. (Marathi Language Compulsory Taxi-Auto )

अनेक संघटनांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं आवश्यक आहे. हे सगळ्यानी मान्य केलं. सगळ्या संघटनांच्या लोकांनी सांगितलं की, आम्ही जमेल तशा मराठी शिकवण्या घेऊ...त्यासाठी सगळ्यांनी मुदत मागितली. 3 महिने, 6 महिने, तर काही जणांनी वर्षभराची मुदत मागितली. यावेळी मुदतवाढी संदर्भात मी त्यांना कुठलाही शब्द दिलेला नाही. उद्या आरटीओची सकाळी 10.30 वाजता बैठक बोलवली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करू...मुदत हवी असेल तर मुदत देण्याचा आम्ही विचार करू...मात्र त्यांची मुजोरी चालणार नाही. मुदतवाढ देण्याची आमची तयारी आहे. मात्र अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. (Marathi Language Taxi-Auto Mumbai)

मुदत देऊ, पण मुजोरी चालणार नाही- प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik On Taxi-Auto Marathi Language)

कुणाच्या रोजी-रोटीवर पाय येता कामा नये. सरकारला कोणाच्याही पोटावर पाय आणायचा नाही. परंतु आम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करू, मात्र हिंदीतच बोलू, अशी त्यांची भूमिका असेल तर हे चालणार नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले. साहित्य परिषदेनेही त्यांच्या ऑफिसेसमध्ये मराठीचे वर्ग घेण्याची तयारी दाखवली. त्यांचे आभार आहेत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले. विविध संघटनांनी ⁠मुदतवाढ मागितली आहे. त्यावर चर्चा करून मुदत द्यायची की नाही ते ठरवू, मुदत देऊ, पण मुजोरी चालणार नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय? (Marathi Language Taxi-Auto Mumbai)

आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईतील अनेक चालक-मालक संघटनांनी आक्षेप घेत 4 मे रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. 

संबंधित बातमी:

Marathi Compulsory Auto Taxi: मनसेला बैठकीला बोलावलं नाही, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठी सक्तीवरुन सरकार माघार घेण्याच्या तयारीत: संदीप देशपांडे

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget