Parbhani Lok Sabha Elction 2024 : परभणी लोकसभेत प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत आहेत. प्रत्यक्षात धनगर समाजावर कोणी अन्याय केला? केंद्रात राज्यात सरकार असतानाही धनगर समाजाला आरक्षण का मिळाले नाही? यावर महादेव जानकर का बोलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची जानकरांसह भाजपावर कडाडून टीका केली आहे. 


जानकारांची निष्ठा एका ठिकाणी नाही


महादेव जानकर यांना शरद पवारांनी माढामधून उमेदवारी जाहीर केली होती, पण जानकर रात्रीतून महायुतीमध्ये सहभागी झाले. जानकारांची निष्ठा कुण्या एका ठिकाणी नाही, असं म्हणत महविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी जानकरांसह भाजपवर सडकून टीका केली आहे. 


संजय जाधवांची महादेव जानकरांवर टीका


इकडे म्हणायचे माझ्याकडे काही नाही, मी स्टेशनला झोपतो अन् दुसरीकडे निवडणुकीत कोट्यवधी खर्चायचे हे पैसे आले कुठून असा सवालही जाधव यांनी जानकरांना विचारला आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील चाटोरी येथे गावकऱ्यांशी संवाद असताना परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे बोलत होते.


ना खाने देंगे लेकीन अकेले डकार देंगे


ना खायेंगे, ना खाने देंगे लेकीन अकेले डकार देंगे, अशी परिस्थिती आहे. भाजपने आपापसात लावलेलं हे षडयंत्र आहे, या पापाला कारणीभूत भाजप आहे. अनेक वर्षानूवर्षे एका गावातील सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, पण भाजपने समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं. आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघात विष पेरलंय. गावागावात लोक एकमेकांचं तोंड बघायला तयार नाहीत, अशी परिस्थिती करुन ठेवली आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोदी-शाहांना डोळ्यापुढे अपयश दिसतंय, म्हणून महाराष्ट्रात सभांचा धडाका; अंबादास दानवेंचा जोरदार निशाणा