Prakash Mahajan On Raj Thackeray and Uddhav Thackeray: हिंदी सक्तीविरोधात (Hindi Language) एकत्र, एकच एक मोर्चा, असं ट्वीट करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी 5 जुलै रोजी मनसेसोबतच्या (MNS) एकत्र मोर्चाची घोषणा केली. या बातमीनं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजली. राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलेलं. तसेच, मराठी भाषेसाठी (Marathi Langauge) सर्वांना एकत्र येण्याचं आवाहनही केलेलं. अशातच यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) या मोर्चात कोणताही झेंडा नसेल, असंही सांगितलं होतं. अशातच आता संजय राऊतांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबतच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलंय.
काही दिवसांपूर्वी बोलताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत, तर नियती त्यांना माफ करणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. अशातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात एकत्र येणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली आहे. यावर प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. मला अत्यंत आनंद झालाय, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे. तसेच, पुढे भविष्य मी आज वर्तमानात सांगू शकत नाही, पण एक सुरुवात चांगली झाली, असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रकाश महाजन काय म्हणाले?
मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले आहेत की, "मला अत्यंत आनंद झालाय. मी बातमी ऐकली, संजय राऊतांनी ट्वीटही केलाय. राज ठाकरेंनी सर्व मराठी माणसांना आवाहन केलेल की, मराठीसाठी तुम्ही एकत्र या... त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. मला याचा आनंद आहे. पुढे काय होईल, काय नाही... भविष्य मी आज वर्तमानात सांगू शकत नाही... पण एक सुरुवात चांगली झाली. ज्या गोष्टीचं आम्ही स्वप्न पाहत होतो, ते स्वप्न पाहायला सुरुवात झाली, ज्या रस्त्यावर एकत्र चालावं असं वाटतं होतं, त्यावर पहिलं पाऊल पडलंय... मराठी माणसासाठी खूप महत्त्वाचंय... मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी हे खूप हिताचं आहे... प्रश्न भाषेचाच नाहीतर अजून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही एकत्र लढा दिला तर निश्चित मराठी माणसाचं भलं होईल.", असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
"मराठी भाषेसाठी आम्ही एकत्र आलोत. आज मला बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांची आठवण आली. त्यांना किती आनंद झाला असेल, भाषेच्या प्रश्नावर का होईना, हे दोघे बंधू एकत्र आलेत. गेल्या 18 ते 20 वर्षांत ठाकरे बंधूंचं एकत्र आंदोलन झाल्याचं आठवत नाही. त्यामुळे नव्या पिढीसाठी हे नवंच आहे. मी स्वतः खूप उत्सुक आहे की, ती 5 जुलैची तारीख कधी येतेय आणि मी सगळं पाहतोय... ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभेल...", असं प्रकाश महाजन म्हणाले.
पाहा व्हिडीओ : Prakash Mahajan on Raj Uddhav : राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र, महाजन म्हणाले..हक्काची जागा झाली
महत्त्वाच्या इतर बातम्या :