Prakash Ambedkar, Mumbai : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोनवेळा फोनवर संपर्क साधला आहे. तसेच आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू असलेले कोंबिग ऑपरेशन तातडीने थांबविण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व समाजकंटकांना अटक करा, अन्यथा तर पुढील दिशा ठरवली जाईल असा इशारा ॲड. आंबेडकर यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, परभणीप्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. दलितांच्या सुरू असलेल्या अटका आणि दलित वस्तीवर सुरू असलेले कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे. तसेच आंबेडकर यांनी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक झाली नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे.
आमदार श्रीजया चव्हाण यांची परभणीबाबत फेसबुक पोस्ट
परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमानाची घटना अत्यंत निंदनीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. देशाचा अभिमान असलेल्या संविधानाचा अवमान कोणत्याही परिस्थिती खपवून घेता कामा नये. आरोपीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी माझी मागणी श्रीजया चव्हाण यांनी केली आहे.
परभणी शहरात आज दुपारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आता शांतता पसरली आहे. स्वतः नांदेड परिक्षेत्राचे आईची शहाजी उमप परभणी ठाण मांडून असून परभणी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या दंगलखोरांनी शहरात धुडघूस घालून नुकसान केले आहे,त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. परभणी शहरासह जिल्हाभरात शांतता पसरली असून कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन स्वतः उमप यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही परभणीकरांना शांततेचा आवाहन केले महत्त्वाचे म्हणजे शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले असून उद्यापासून मनपा आणि तहसीलदार यांच्या वतीने हे पंचनामे केले जाणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या